शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पल्स पोलिओ मोहिमेला जनतेचे सहकार्य आवश्यक

By admin | Updated: January 17, 2015 22:56 IST

१८ जानेवारीला राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले आहे.

चंद्रपूर : १८ जानेवारीला राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले आहे.राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत भारत देश संपूर्ण पोलिओ मुक्त करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. भारत लवकरात लवकर पोलिओ मुक्त व्हावा, भारतात पुढील काही वर्षात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, असा उद्देश समोर ठेवून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.पोलिओ रोगाचे निर्मूलन करण्याच्या हेतूने भारत सरकार १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवित आहे. तसेच नियमित लसीकरण, ए.एफ.पी. सर्वेक्षण व पोलिओ पल्स आढळल्यास मॉप-अप राऊंड याद्वारे पोलिओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. भारत देशात जानेवारी २०११ नंतर अद्यापर्यंत पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाची सुरूवात झाल्यापासून प्रथमच अशा पद्धतीने यश मिळालेले आहे. जानेवारी २०१४ मध्ये भारत देशास पोलिओ निर्मूलन प्रमाणपत्र मिळाले आहे. परंतु आजघडीला सन २०१४ मध्ये जगात आढळलेल्या एकुण ३५० पोलिओ रुग्णापैकी २९७ पोलिओ रुग्ण आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तान आढळले आहेत. तसेच काही देशात पोलिओ निर्मूलनानंतरही पोलिओ रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे संपुर्ण जगातून पोलिओ निर्मूलन होईपर्यंत हा कार्यक्रम सुरूच राहणार आहे.यापुढेही भारतातून पोलिओ रुग्णाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता याावर्षी सुद्धा पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेची पहिली फेरी रविवारी १८ जानेवारी रोजी राबविण्यात येत आहे. या दिवशी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ बुथवर नेऊन पोलिओ लस पाजण्याचे आवाहन संध्या गुरनुले यांच्यासह उपाध्यक्ष कल्पना बोरकर, आरोग्य व अर्थ सभापती ईश्वर मेश्राम यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.जिल्ह्यातील पल्स पोलिओ मोहीम चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)