चंद्रपूर: चांदा शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित जनता महाविद्यालयातील हिंदी विषयाच्या प्राध्यापिका डॉ.प्रमिला महानंदे यांनी भीष्म साहनी यांनी लेखनात वापरलेल्या भाषेचा शास्त्रीय अभ्यास करून ‘भीष्म साहनी के साहित्य का सैद्धांतिक विवेचन’ हे हिंदी भाषेत पुस्तक लिहिले. त्याचा प्रकाशन सोहळा बुधवारी जनता महाविद्यालयात पार पडला.जनता महाविद्यालयात ‘अविष्कार-२०१५’ च्या उद्घाटन सोहळ्यात गोंडवाना विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.अशोक जिवतोडे, डॉ. ईश्वर मोहुर्ले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. सुभाष, प्रा.एन.आर. बेग प्रामुख्याने उपस्थित होते. सदर पुस्तक लिहिण्याची प्रेरणा डॉ.अशोक जिवतोडे, डॉ.एम.सुभाष, डॉ.टी.के. टायटस, राजेश पाटील यांच्याकडून मिळाल्याचा उल्लेख करून डॉ.प्रमिला महानंदे यांनी या पुस्तकासाठी हिन्दी विभाग प्रमुख डॉ.सरिता तिवारी, ग्रंथपाल प्रशांत चहारे यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रमिला महानंदे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
By admin | Updated: December 28, 2015 01:28 IST