शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

By admin | Updated: November 21, 2015 01:21 IST

महाराष्ट्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विकासछाया व घडी पुस्तिकेचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ...

वर्षपूर्ती घडीपुस्तिका प्रकाशित : विविध योजनांचा घेतला आढावाचंद्रपूर : महाराष्ट्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विकासछाया व घडी पुस्तिकेचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २० रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रकाशन करण्यात आले. विकास कामावर आधारीत छायाचित्र असलेली विकासछाया पुस्तिका व एक वर्ष प्रगतीचे विश्वासाचेङ्घया घडी पुस्तिकेच्या प्रकाशनाला वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार शोभाताई फडणवीस, विजय वडेट्टीवार, प्रा. अनिल सोले, नाना शामकुळे, अ‍ॅड. संजय धोटे, सुरेश धानोरकर, कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर उपस्थित होते. गेल्या वर्ष भरात सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयाची थोडक्यात माहिती या घडी पुस्तिकेत देण्यात आली आहे. तर विकासछाया पुस्तिकेत विकास कामाची छायाचित्र समाविष्ट आहेत. जलयुक्त शिवार, वन विभाग, महाराजस्व अभियान, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग व पीक कर्ज या विषयीची माहिती या पुस्तिकेत दिली आहे. वनमंत्री म्हणून ना. मुनगंटीवार यांनी गेल्या एका वर्षात लोकहिताचे ४२ निर्णय घेतले आहेत. तर जलयुक्त शिवारमध्ये जिल्ह्यात अतिशय चांगले काम झाले आहे. महाराजस्व अभियानात अनेक लोकांना विविध दाखले वाटप करण्यात आले.सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या एक वर्षात सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. चंद्रपूर जिल्ह्याचाच विचार करायचा झाल्यास जिल्हा आज विकासाच्या नव्या वळणावर आहे. चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्र, वनस्पती उद्यान, सैनिकी शाळा, चांदा ते बांदा विकास करण्यासाठी समितीचे गठण, ताडोबाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणे, महानायक अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत नेमणे, जिल्ह्याच्या विकासात लोकांचा सहभाग घेण्यासाठी ठिकठिकाणी विकास परिषद घेणे, बांबू परिषद, बाबुपेठ उड्डाण पुलासाठी निधी, मॉडेल पोलीस स्टेशन बल्लारपूर, मूल बल्लारपूर शहरात सीसीटीव्ही बसविणे, बस स्थानकाचे आधुनिकीकरण, चंद्रपूर शहर विकासाठी निधी उपलब्ध करून देणे, गोसेखुर्दचे पाणी जिल्हयात आणणे, डिसेंबर मध्ये होणारा ताडोबा पर्यटन महोत्सव, बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचानालय, स्वातंत्र्य सैनिकांसाठी आरोग्य शिबिर, भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम उद्यान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई रकमेत वाढ, माजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्तसाठी निधीत भरपूर वाढ, उद्योगाला चालना देण्यासाठी मेक इन चंद्रपूर असे असंख्य निर्णय एका वर्षाच्या कार्यकाळात घेतले आहेत. वनविभागाला कधी नव्हे ते विकास झोतात आणण्याचे काम या वर्षभरात झाले आहे. वनातील वन उपजापासून महसुल प्राप्त करून देणारी वनधन जनधन ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात प्रथमच आखण्यात आली. वनात ३३ प्रकारची वन उपज निर्माण होतात याचा उपयोग वन महसूल वाढविण्यासाठी होऊ शकतो ही बाब ओळखून नागपूर येथे राज्यातील पहिले वनधन जनधन विक्री केंद्र सुरु केले. अशाच प्रकारच्या विक्री केंद्राची साखळी आता राज्यभर निर्माण केली जाणार आहे. बफर क्षेत्रातील वनालगतच्या गावांचा विकास साधणारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना तर गावांचा कायापालट करणारी योजना आहे. या निर्णयाचा या पुस्तिकेत उल्लेख करण्यात आला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)