शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जोगापूर जंगलात लोकसहभागातून पर्यटन सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST

जंगल सफारीसाठी जोगापूर परिसरातील वनक्षेत्र पोषक आहे. गाववस्ती व शेती नसलेले घनदाट जंगल पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकते. वन विभाग ...

जंगल सफारीसाठी जोगापूर परिसरातील वनक्षेत्र पोषक आहे. गाववस्ती व शेती नसलेले घनदाट जंगल पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकते. वन विभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने जोगापूर जंगल परिसरातील बैलगाडी रस्ते व कूप रस्ते, जंगल नियमित गस्तीच्या रस्त्यांचा वापर करून ४० किमी अंतराचे कच्चे रस्ते तयार केले. लोकसहभागातून वन्यजीव व्यवस्थापन, मानव व वन्यजीव यांच्यातील सहजीवन प्रस्थापित करणे, वनाचे शाश्वत जतन करून अवलंबन कमी करण्याचे नियोजन राजुरा वनपरिक्षेत्र कार्यालयाने केले. पायाभूत कामे पूर्ण झाल्यानंतर शनिवारपासून पर्यटनाला आमदार सुभाष धोटे यांच्यासमक्ष सुरुवात झाली.

जोगापूर जंगलाचे वैशिष्ट्य काय?

जोगापुरातील जंगलात विविध वन्यप्राणी, खडकी तलाव, बोर तलाव, पिपरबोडी, भिवकुंड, सिंगागुफा, पिवळा पाणी, बाबापूर मंदिर, सिंचन तलाव, धावडाबोडी, वाच टॉवर, खिरणी व दौड तलाव, इमली गुफा, गोमती पूल, जोगापूर मंदिर, कविची शिळ, वाघ नाला, निळा व लाल तलाव, कासला गोटा पर्यटकांना आकर्षित करू शकतात. २०० झाडे, २५० प्रकारचे पक्षी व विविधरंगी फुलपाखरेही बघायला मिळतात. राजुरा ते आसिफाबाद मार्गावर जोगापूर पर्यटन क्षेत्राचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रति वाहन शुल्क ५०० तर गाईड शुल्क ३५० रुपये असे एकूण ८५० रुपयात पर्यटनाचा आस्वाद घेता येईल.

कोट

सकाळी ६ ते १० वाजता व दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत सकाळी ६ वाहन व दुपारी ६ वाहनांना प्रवेश देण्यात येईल. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर खासगी वाहन प्रवेश व भविष्यात केवळ नोंदणीकृत वाहनांनाच परवागनी देण्यात येणार आहे.

- विदेशकुमार गलगट, वनपरिक्षेत्र अधिकारी, राजुरा.