चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध योजनांची माहिती लोकापर्यंत चित्ररथाव्दारे पोहोचविण्यात येणार आहे. या चित्ररथाला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपविभागीय अधिकारी शंतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी विनोद हरकंडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास सुरेश वानखेडे, सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी प्रसाद कुळकर्णी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे उपस्थित होते.शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध योजनांची माहिती सामान्य जनतेला व्हावी यासाठी योजनांच्या माहितीचा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ जिल्ह्यातील विविध गावात जाऊन शासनाच्या योजनांची माहिती लोकापर्यंत पोहचविणार आहे. तसेच कलापथकाव्दारे गावागावांमध्ये योजनांविषयी जाणीव जागृती करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार, महाराजस्व अभियान, वन विभागाचे निर्णय, आदिवासी योजना, स्वच्छता मिशन, कर्ज वाटप, कृषी पंप जोडण्या, दारुबंदी या योजनांची माहिती दिली जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त चित्ररथाव्दारे योजनांची जनजागृती
By admin | Updated: November 3, 2015 00:27 IST