शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

महिलांच्या कायदेविषयक अधिकारांविषयी जनजागृती

By admin | Updated: September 4, 2015 01:01 IST

स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीतर्फे महिलांचे कायदे विषयक अधिकार या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

विविध कायद्याची दिली माहिती : सरदार पटेल महाविद्यालयाचे आयोजनचंद्रपूर : स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीतर्फे महिलांचे कायदे विषयक अधिकार या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. महिला सहाय्यक कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा खरसान यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले होते. प्रमुख अतिथी म्हणून पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा. स्वप्नील माधमशेट्टीवार, महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख डॉ. राजलक्ष्मी रणराग कुळकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. जयश्री धांडे आदी उपस्थित होते.महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंधक घालण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम राबविले जात आहेत. विशाखा जजमेंट व महिलांचे लैगिक छळापासून संरक्षण, अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार महाविद्यालयीन स्तरावर महिला तक्रार निवारण समितीचे गठन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. समितीच्या प्रमुख डॉ. राजलक्ष्मी कुळकर्णी यांनी प्रास्ताविकातून समितीच्या कार्याविषयी व उद्देशांविषयी माहिती दिली.वर्षा खरसान यांनी, विविध चित्रफितीद्वारे आणि स्लाईड शोच्या माध्यमातून प्रभावीपणे विद्यार्थ्यांना या विषयाच्या गांभीर्याची जाणीव करुन दिली. तसेच महिलाविषयी असणाऱ्या कायद्यांची व त्यातील तरतुदींविषयी आणि होणाऱ्या शिक्षेविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तरानाही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. अध्यक्षीय मार्गदर्शनातून उपप्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले यांनी महाविद्यालयीन स्तरावर युवक युवतींना एकत्र शिकताना आणि आजच्या फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपच्या युगात या विषयाचे महत्त्व विषद केले. स्त्रीयांविषयीच्या कायद्याबाबत जागरुकता निर्माण करावी, यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन सुवर्णा कत्तुरवार हिने तर आभारप्रदर्शन प्रा. वनश्री लाखे यांनी मानले. कार्यक्रमाला माया कांबळे, महिला तक्रार निवार समितीचे सर्व सदस्य, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रमोद नारळे, गुरुदास शेंडे, राजेश इंगोले, प्रतिमला सोरते, सुवर्णा कुलटे, प्रवीण मडावी आदीनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)