शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आणि स्वच्छता पार्कच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी लोकजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सुधीर मुनगंटीवार : मूल येथे पाणी आणि स्वच्छता पार्कचा लोकार्पण सोहळा मूल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वांना शुध्द पाणी मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाकरिता कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना आवश्यक असून शोष खडडे करून सांडपाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. पाणी आणि स्वच्छता पार्कच्या माध्यमातून या संदभार्तील मोहीम अधिक गतीमान होईल व त्या माध्यमातून लोकजागरण होत, या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्हा अग्रेसर होईल, असा विश्वास राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारा पंचायत समिती मूलच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पाणी आणि स्वच्छता पार्कच्या लोकार्पण सोहळयात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, माजी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवार, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे, शितल बांबोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अशोक सिरसे, गटविकास अधिकारी प्रदिप पांढरबळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.मूल शहरात उभारण्यात आलेल्या या पाणी आणि स्वच्छता पार्कच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागरण होतानाच पाण्याची साठवण आणि पाण्याचा वापर तसेच नियोजन याबाबत सुध्दा लोकजागरण होणार आहे. नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाला व शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी बोलताना केले. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी पार्कची पाहणी केली. नांदेड पॅर्टन सोप पिट बॉयोगॅस टॉयलेट, घरगुती बाथरूम ओटा अशा विविध वैशिष्यपूर्ण मॉडेल्सच्या माध्यमातून या पार्कमध्ये स्वच्छतेविषयी संदेश देण्यात आले आहे. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)