शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई’ चित्रपटाचे चित्रीकरण आनंदवनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:59 IST

मराठी रसिकांच्या मनावर कायमचा ताबा मिळविणारे पु. ल. देशपांडे व आनंदवन यांचे अतुट संबंध अखेरच्या श्वासापर्यंत राहिले. पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्याकरिता प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या चमूसह आनंदवनात दाखल झाले होते. चित्रपट ४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मराठी रसिकांच्या मनावर कायमचा ताबा मिळविणारे पु. ल. देशपांडे व आनंदवन यांचे अतुट संबंध अखेरच्या श्वासापर्यंत राहिले. पु. ल. देशपांडे यांच्यावरील ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्याकरिता प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या चमूसह आनंदवनात दाखल झाले होते. चित्रपट ४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.भाईच्या आयुष्यभराच्या गोष्टी चित्रपटातून नाकारल्या जाणार असून भाई एक माणूस म्हणून कसे होते, त्यांनी आयुष्यात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पं. भिमसेन जोशी, कर्मयोगी बाबा आमटेंसारखी मानसे जोडली. आनंदवनात पु. ल. देशपांडे नियमित मित्र मेळावा घेत. आनंदवनातील कुष्ठरोगी, मूक-बधीर आदींना नाटक बघावयास मिळावे म्हणून आनंदवनातील मुक्तांगण हे व्यासपीठ तयार करून त्यावर प्रसिद्ध नाटके पु.ल. देशपांडे हे आणत. आनंदवनवासियांना बघावयास मिळत होती. पु. ल. देशपांडे यांचे आनंदवनातील नाते अतुट होते. त्यामुळे पु. ल. देशपांडे आनंदवनात येणार असल्याची माहिती आनंदवनवासीयांना मिळताच त्यांचा आनंद ओसंडून वाहत असे. आनंदवनातील दिव्यांगांच्या विवाह सोहळ्यातील मंगलाष्टके भाई स्वत: म्हणत होते. भाई आणि कर्मयोगी बाबांच्या ऋुणानूबंधाचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे. सागर देशमुख-पु.ल. देशपांडे, इरावती हर्षे-सुनीताबाई, मेघा मांजरेकर-साधनाताई तर संजय खापरे-बाबांची भूमिका साकारणार आहे. उदास व गंभीर चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटविणारे पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यकृतीवर चित्रपट झाले. परंतु, पु.ल. देशपांडेवर चित्रपट १७ वर्षानंतर येताहेत अशा भावना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त करीत ‘भाई व्यक्ती की वल्ली’ हा मराठी चित्रपट नक्कीच आवडेल असा आशावाद व्यक्त केला. कर्मयोगी बाबा आमटे यांचे कार्य अफाट आहे, त्यामुळे त्यावर बायोपीक करण्याचा मानस याप्रसंगी महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला.