शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध कराव्या

By admin | Updated: October 9, 2015 01:45 IST

वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा दौरा करून तेथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोई सुविधांचा अभ्यास करून

सुधीर मुनगंटीवार : उच्चस्तरीय बैठकीत दिले निर्देशचंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा दौरा करून तेथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोई सुविधांचा अभ्यास करून तशा प्रकारच्या सोई सुविधा चंद्रपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने अहवाल सादर करण्याचे निर्देश वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.७ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा घेतला. वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडकडून महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावा, महाविद्यालयाच्या ५० एकर जागेमध्ये वृक्षारोपण करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, रुग्णसेवेसाठी लागणारी अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देत ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र बल्लारपूर अद्ययावत करावे, विद्यार्थ्यांसाठी टी.बी. हॉस्पिटल परिसरात वसतिगृहाचे बांधकाम करण्याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर कारावा, अंबेजोगाई, धुळे , नांदेड व यवतमाळप्रमाणे चंद्रपूर येथील अध्यापकांना वेतनामध्ये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. चंद्रपूर येथील महाविद्यालयामध्ये वरिष्ठ निवासी अधिकारी व टयुटर यांच्या वेतनामधील तफावत दूर करावी, टी.बी. हॉस्पिटलसाठी पर्यायी इमारत बांधून देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.या बैठकीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, संचालक आरोग्य डॉ सतीश पवार, अधिष्ठाता डॉ. मोरे, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर , वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक मिश्रा, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जयस्वाल तसेच वैद्यकीय विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)