शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीय तथा सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देणार

By admin | Updated: November 16, 2016 00:55 IST

केंद्रात सत्ता स्थापित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेत विविध योजना सर्वसामान्य नागरिकांना दृष्टीक्षेपात ठेवून सुरू केल्या.

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने व्हावीचंद्रपूर : केंद्रात सत्ता स्थापित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेत विविध योजना सर्वसामान्य नागरिकांना दृष्टीक्षेपात ठेवून सुरू केल्या. सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी केंद्र शासनाने नागरी भागातील राज्य व केंद्र सरकारच्या समान अर्थसहाय्यातून प्रधानमंत्री आवास योजनेची मुहूर्तमेढ रोवली असून जगाच्या पाठीवर अशा प्रकारच्या धाडसी निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. या योजनेच्या यशाकरिता यंत्रणामधील अधिकाऱ्यांनी अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचविण्याकरिता परिश्रम घ्यावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) मागणी सर्वेक्षण कार्यशाळेच्या शुभारंभ ते बोलत होते. महानगरपालिका सभागृहामध्ये १४ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या कार्यशाळेस महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त संजय काकडे, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, भाजपा गटनेते अनिल फुलझेले, धनंजय हूड, ऐस्तेर शिरवार, राहूल सराफ सर्व नगरसेवक, मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी ना. अहीर म्हणाले, ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी असून या योजनेमुळे घरांचे स्वप्न बघणाऱ्या अल्प व मध्यम उत्पन्न गटातील कुटूंबियांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे. यातून सर्वांचा विकास ही पंतप्रधानांची भूमिका प्रत्यक्षात उतरत आहे. निवाऱ्यापासून वंचित लोकांचे स्वप्न या योजनेमुळे साकार होणार आहे. आजवर गोर गरीबांच्या हिताच्या योजना राबविण्यात आल्या असल्या तरी त्यांना आर्थिक स्थैर्य व सक्षमता लाभली नाही. मात्र आता सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास बळ मिळत आहे, असेही ते म्हणाले.कार्यशाळेत मनपा महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, आयुक्त संजय काकडे, यांनीही या योजनेच्या माध्यमातून फार मोठे कार्य चंद्रपूर महानगरात घडणार असल्याचे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. यावेळी ललीता तेलंग या प्रथम लाभार्थी महिलेचा संगणकीय अर्ज भरण्यात आला. या कार्यशाळेत चंद्रपूर शहरातील शेकडो लाभार्थी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)