शिवसेनेचे चंद्रपुरात आंदोलन : वीज बिलवाढीचा विरोधलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वीज वितरणच्या बाबुपेठ येथील मुख्य अभियंता कार्यालयाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सोमवारी वीज बिलाचे तोरण बांधून सजावट व धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी मुख्य अभियंता दिलीप घुगूल यांच्याशी शिवसेना नेते जोरगेवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने चर्चा केली. चंद्रपूरच्या नागरिकांना २०० युनीटची वीज मोफत देण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेत जोरगेवार यांनी वीज बिलामध्ये होत असलेल्या भरमसाठ वाढीविरोधात सदर आंदोलन असल्याचे सांगितले. तसेच नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी उत्पादन होते, तेथील जनतेला ते उत्पादन कमी दरात उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. येथील वीज उत्पादनामुळे नागरिक प्रदूषण व गर्मी सहन करते. मात्र त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा चंद्रपुरातील वीज बाहेर जाण्यास प्रतिबंध घालण्यासाठी शिवसेनेला प्रखर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी दिला. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष धानोरकर, रवींद्र लोनगाडगे, विशाल निंबाळकर, राजेश नायडू, दीपक दापके, माया पटले, सायली येरणे, वंदना हातगावकर, संतोषी चव्हान, सुजाता बल्ली, पेंदामताई, रजनी चिंचोळकर, नितीन नागरीकर, विनोद अनंतवार, विलास वनकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते.
२०० युनिटपर्यंत मोफत वीज द्या
By admin | Updated: July 11, 2017 00:25 IST