शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकाचे तातडीने सर्वेक्षण करुन आर्थिक मदत द्या

By admin | Updated: November 20, 2014 22:50 IST

मूल सर्कलमधील राजोली सिंचाई शाखेअंतर्गत येणाऱ्या गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील गांगलवाडी, चिखली, ताडभूज या गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील धानाचे पीक संपूर्णपणे उद्धवस्त झाले.

चंद्रपूर : मूल सर्कलमधील राजोली सिंचाई शाखेअंतर्गत येणाऱ्या गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील गांगलवाडी, चिखली, ताडभूज या गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील धानाचे पीक संपूर्णपणे उद्धवस्त झाले. त्यामुळे प्रत्यक्ष मोक्यावर जावून सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाईकरीता शासनाकडे अहवाल सादर करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आपदग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर तसेच राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन सादर करुन नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याची विनंती केली आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे गोलाभूज तलाव न भरला नाही. रोवणीनंतर केवळ एकदाच तलावातील पाणी काही मोजक्याच गावातील शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आले. मात्र तलावात पुरेशे पाणी नसल्याची सबब पुढे करुन पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या धान पिकास सिंचनाची सोय न झाल्याने शेकडो हेक्टर शेतजमिनीमधील धानाचे पीक नष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, नुकसानीचे प्रत्यक्ष मोक्यावर जावून सर्व्हेक्षन होत नसल्याने रस्त्याच्या लगत असलेल्या जमिनीमधील पिकांना अपेक्षित धरुन संबंधित अधिकारी आणेवारी घोषित करीत आहेत. त्यामुळे नुकसान होवूनही अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.यावर्षीही शेतकऱ्यांवर दरवर्षीसारखा अन्याय होऊ नये, गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली त्या पिकांची प्रत्यक्ष मोका चौकशी तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने तहसीलदार मूल व संबंधित तलाठ्यांना देण्यात यावे, अशी मागणी गांगलवाडी ग्रामपंचायतचे सरपंच ताराबाई चांभारे, उपसरपंच शालिकराम चांभारे, श्रीहरी चांभारे, सोनबाजी केवे, विनोद चांभारे, विठ्ठल काटकर, आत्माराम चिचघरे, शामसुंदर कडस्कर, चिखलीचे सरपंच लहुजी कडस्कर, मुकूंदराव खोडपे, संपतराव जेंगठे तसेच अन्य गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)