शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोविड रूग्णांना सर्वोत्तम सुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST

महिला रूग्णालयात २० केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक उभारण्यात आले. आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजेन चाचण्या वाढविल्याने बाधित पुढे येत आहेत. रूग्णांचा अहवाल येईपर्यंत होम आयसोलेशनमध्ये ठेवावे, सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिल्या. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० ऑक्सिजन बेड वाढविण्याचे कार्य सुरू आहे. ग्रामीण भागात ४०० बेड वाढवून देण्याची कार्यवाही झाली. जिल्ह्याला दीडहजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख : रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटात रूग्णांना सर्वोउत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात. त्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या उपाययोजना तातडीने उपलब्ध कराव्यात. वैद्यकीय रूग्णालयाच्या निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड आदी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख म्हणाले, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी केले. यावेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य समस्या तातडीने सोडविण्याची मागणी ना. देशमुख यांच्याकडे केली. बैठकीनंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्माणाधीन इमारतीची पाहणी केली. 

प्रत्येक तालुक्यात ५० ऑक्सिजन बेड्स : विजय वडेट्टीवारमहिला रूग्णालयात २० केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक उभारण्यात आले. आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजेन चाचण्या वाढविल्याने बाधित पुढे येत आहेत. रूग्णांचा अहवाल येईपर्यंत होम आयसोलेशनमध्ये ठेवावे, सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिल्या. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० ऑक्सिजन बेड वाढविण्याचे कार्य सुरू आहे. ग्रामीण भागात ४०० बेड वाढवून देण्याची कार्यवाही झाली. जिल्ह्याला दीडहजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.

ना. देशमुखांच्या बैठकीत भाजपच्या लोकप्रतिनिधींना डावलल्याची चर्चाचंद्रपूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख हे मंगळवारी चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला शासनाच्या प्रोटोकाॅलप्रमाणे सर्व आमदारांना निमंत्रित करणे गरजेचे होते. मात्र काँग्रेस आमदारांसह एक अपक्ष आमदारांनाच या बैठकीचे निमंत्रण दिले. जिल्ह्यात माजी अर्थमंत्री व लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार व चिमूरचे आमदार बंटी भांगडिया हे दोन भाजपचे आमदार आहेत. त्यांना या बैठकीला निमंत्रितच करण्यात आले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार यांनाही बैठकीचे निमंत्रण नसल्याचे समजते. ही राज्याच्या मंत्र्यांची बैठक होती वा काँग्रेसची, कोरोनाची लढाई सर्व राजकीय मतभेद विसरून लढण्याची गरज असताना हा भेदभाव का, असे सवालही यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

आरोग्यसेवक कंत्राटी पद्धतीने घ्यावेवैद्यकीय कर्मचाºयांना निवासाची व्यवस्था, वैद्यकीय शिक्षण घेणाºया मुला-मुलींचे वसतीगृह, अग्निसुरक्षा व्यवस्थेची माहिती प्रकल्प प्रमुख विनोद कुमार यांनी चित्रफितीच्या माध्यमातून सादर केली. महिला रूग्णालयाला भेट देत प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी कंत्राटी पद्धतीने आरोग्यसेवक नियुक्त करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmit Deshmukhअमित देशमुख