शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

वैद्यकीय महाविद्यालयात मूलभूत सुविधा पुरवा

By admin | Updated: August 9, 2015 01:08 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास लागणा-या मूलभूत सोई सुविधा तातडीने पुरविण्याच्या सूचना देतानाच १ सप्टेंबरपासून....

सुधीर मुनगंटीवार : राखीव जागा ठेवण्यासाठी प्रयत्नचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास लागणा-या मूलभूत सोई सुविधा तातडीने पुरविण्याच्या सूचना देतानाच १ सप्टेंबरपासून महाविद्यालय सुरळीतपणे सुरु होईल याची काळजी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी वैद्यकीय महाविद्यालय आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.प्रवीण सिनगारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम. मुरंबीकर, अधिक्षक अभियंता डी.के. बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जैस्वाल, अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ.अनंता हजारे उपस्थित होते.अध्यापकीय संवगार्ची पदे नियमित स्वरुपात भरणे, वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गाची पदे नियमित स्वरुपात भरणे, आवश्यक फर्निचर उपलब्ध करणे, उपकरणाचा पुरवठा आदेश निर्गमित करणे, परीक्षागृह व कँटिनची सुविधा उपलब्ध करुन देणे, पदवी पूर्व मुलांचे व मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात करणे, नवीन जागेवर जोड रस्ता व पुलाचे बांधकाम करणे, नवीन जागेच्या विकास आराखडयात बदल करणे व नवीन इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता देणे, या विषयाचा या बैठकीत पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला.वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गाची १६० पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून २० आॅगस्टपर्यंत ते रुजू होणार आहेत. परीक्षागृह, कँटिन, मुला-मुलींचे वसतिगृह व अधिकारी-कर्मचा-यांची निवासस्थाने यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. निवास्थानाचे बांधकाम उत्कृष्ट व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्याच्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते, स्ट्रीट लाईट व सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. यासाठीचा निधी मंजूर केला असून जिल्हाधिका-यांनी प्रशासकीय मान्यता घ्यावी, असे ते म्हणाले.वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे डिझाईन उत्कृष्ट दर्जाचे असावे, असे पालकमंत्री म्हणाले. नांदेड, बारामती व अहमदाबाद येथील डिझाईन उत्तम असल्याचे संचालक डॉ.सिनगारे यांनी नमूद केले. त्याच धर्तीवर चंद्रपूर येथील डिझाईन असावे, असे पालकमंत्री म्हणाले. नव्या इमारतीत मोठ्या प्रमाणावर सोई सुविधा ठेवण्यात याव्यात. सोबतच एखादा छोटेखानी मॉलही आराखडयात ठेवावा. या सत्रातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून १२ आॅगष्टला यादी लावण्यात येणार आहे. ८५ मुलांचा प्रवेश निश्चित झाला असून १५ मुलांचा प्रवेश केंद्र सरकार अख्त्यारीत असून तोही लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती डॉ.सिनगारे यांनी दिली. नक्षलग्रस्त जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखून ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे ना.मुनगंटीवार म्हणाले. (प्रतिनिधी)