शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संडे मार्केटला गंजवॉर्डवासीयांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:18 IST

शहरात डॉ.आंबेडकर चौक ते बिनबा गेट येथे रविवारी भरणारा संडे मार्केट गंजवॉर्ड येथे भरविण्याचा ठराव मनपाने घेतला. परंतु हा ठराव पारित करताना मनपा प्रशासनाने गंजवॉर्ड परिसरातील रहिवाशांंना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मनपाचा ठराव एकतर्फी असून गंजवॉर्डवासीयांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे हा ठराव रद्द करून संडे मार्केट दुसऱ्या ठिकाणी भरवावे, अशा आशयाचे निवेदन परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.

ठळक मुद्देआयुक्तांना निवेदन : इतर ठिकाणी हलविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात डॉ.आंबेडकर चौक ते बिनबा गेट येथे रविवारी भरणारा संडे मार्केट गंजवॉर्ड येथे भरविण्याचा ठराव मनपाने घेतला. परंतु हा ठराव पारित करताना मनपा प्रशासनाने गंजवॉर्ड परिसरातील रहिवाशांंना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मनपाचा ठराव एकतर्फी असून गंजवॉर्डवासीयांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे हा ठराव रद्द करून संडे मार्केट दुसऱ्या ठिकाणी भरवावे, अशा आशयाचे निवेदन परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.शहरातील गंजवॉर्ड येथे पूर्वीपासून धान्य बाजार व भाजी बाजार असल्याने दिवसभर जडवाहतुकीची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे सततच्या वाहतुकीमुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच भाजी बाजार असल्यामुळे सडणाºया भाज्यांच्या दुर्गंधीचा सामना गंजवॉर्डवासियांना करावा लागतो. तसेच गंजवार्ड या भागात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची दवाखाने आहेत. बºयाच गंभीर रुग्णांना त्यांच्या दवाखाण्यात भरती करताना वाहतुकीमुळे मोठी अडचण जाते.सोमवार ते शनिवार या मार्गावर बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी राहते. केवळ रविवारी परिसरातील नागरिकांना ध्वनी प्रदूषण, वाहतूकीची अडचण यापासून मुक्ती मिळत होती. मात्र आता मनपाने रविवारी संडे मार्केट गंजवॉर्डात भरविण्याचा ठराव घेतला. मात्र ठराव घेताना परिसरातील नागरिकांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संडे मार्केटला विरोध करीत हा ठराव रद्द करावा, व संडे मार्केट इतर ठिकाणी भरविण्यात यावा, अशी मागणी केली. निवेदन देताना नगरसेवक संजय कचर्लावार, अ‍ॅड अभय पाचपोर, सादिक हुसेन, राजू नंदनवार, विरु यमलवार, प्रभाकर पटकोटवार आदी उपस्थित होते.