शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

पत्रकारांनी घेतला निषेधाचा ठराव

By admin | Updated: December 22, 2015 01:15 IST

राजुरा तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून वृत्तसंकलन करणाऱ्यांवर माफियाकडून दबाव आणल्या जात आह.

राजुरा : राजुरा तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून वृत्तसंकलन करणाऱ्यांवर माफियाकडून दबाव आणल्या जात आह. मारहाण केल्या जात आहे. राजुरा शहरात मागील काही काळात पत्रकार अनिल बाळ सराफ यांच्यावर जीवघेणा हमला झाला. नागपुरातील एका प्रादेशिक दैनिकाचे स्थानिक पत्रकार बादल बेले यांना जबर मारहाण झाली. तसेच सुरेश साळवे यांच्यावर रेती माफियांनी हमला करण्याचा प्रयत्न केला. ‘लोकमत’चे शहर प्रतिनिधी प्रा.बी.यू. बोर्डेवार यांच्याविरुद्ध महिलांना चिथावून पोलिसांत खोटी तक्रार केली. भविष्यातसुद्धा असे प्रकार राजुरा शहरात होऊ शकतात. यामुळे याची पत्रकार संघाने गंभीर दखल घेत ५० पत्रकारांनी निषेध ठराव नोंदवून परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधीक्षक सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक प्रमोद डोंगरे यांना निवेदन दिले.याप्रसंगी दोन्ही पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद भेंडे, मसुद अहमद, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ.उमाकांत धोटे, ज्येष्ठ पत्रकार मोहन शर्मा, विनायक देशमुख, महीयर गुंडेविया, अनिल बाळ सराफ, प्रा.बी.यू. बोर्डेवार, बादल बेले, प्रवीण देशकर, सुरेश साळवे, गणेश बेले, सादिक काझी, एजाज अहमद, आनंद चलाख, बाबा बेग, एम.के. शेलोटे, मंगेश बोरकुटे, क्रिष्णकुमार पोचम, रंगराम कुळसंगे, श्रीकृष्ण गोरे, वामन पुरटकर, प्रा.सय्यद जाकीर, मंगेश श्रीराम, प्रवीण मेकर्तीवार, अजय आरमुलवार, जितेंद्र दुबे, अजय येलकापल्ली, जमीर शेख, अविनाश दोरखंडे, विजय चन्ने, बंडू वनकर, प्रा.राजेंद्र मोरे, उमेश मारशेट्टीवार, रूपेश चिडे, अमित जयपूरकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)बसच्या धडकेत एक ठारबल्लारपूर : एसटी बस मागे घेत असताना, बसची जबर धडक बसल्याने एक इसम जागीच ठार झाल्याची घटना येथील बस स्थानकावर शनिवारी दुपारी घडली. मृत इसमाची ओळख पटली नाही. मृताचे वय अंदाजे ७० वर्ष आहे. एम.एच.एच. ८०२८ या ही भामरागड-चंद्रपूर ही बस बल्लारपूर बसस्थानकावर येऊन ती परत जात असताना हा अपघात बस स्थानकाचे आवारातच घडला. (तालुका प्रतिनिधी)पत्रकारांना संरक्षण देऊ - नायक४राजुरा तालुक्यातील पत्रकारांवर कुणीही हल्ल्याचा बेत रचत असेल तर त्याला मी सोडणार नाही, तुम्ही मला माहिती द्या मी कडक कारवाई करीन, अशी ग्वाही विश्रामगृहात सर्व पत्रकारांना परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक प्रमोद डोंगरे यांनी दिली.