शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सीटीपीएससमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:55 IST

विदर्भ क्षेत्र सर्वच बाबतीत संपन्न असताना ५७ वर्षे महाराष्ट्रात राहून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेती, उद्योग, व्यापार, वीज, सिंचन, रोजगार, कल्याणकारी व लाभाच्या योजना या सर्वच क्षेत्रात मोठे शोषण झाले आहे.

ठळक मुद्देसंघर्षासाठी तरुणांनी पुढे यावे : वामनराव चटप यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भ क्षेत्र सर्वच बाबतीत संपन्न असताना ५७ वर्षे महाराष्ट्रात राहून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेती, उद्योग, व्यापार, वीज, सिंचन, रोजगार, कल्याणकारी व लाभाच्या योजना या सर्वच क्षेत्रात मोठे शोषण झाले आहे. आता आपल्यावरील अन्यायाविरुद्ध वैदर्भीय जनतेने आणि आपल्या न्याय हक्कासाठी तरुणांनी पुढे येऊन संघर्षाचे बिगुल फुंकावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जेष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले.चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे व आदी मागण्यांसाठी बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप बोलत होते. शेतकºयांना संपुर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा, अशी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेची पुर्तता करावी, विजेचा दर निम्मे करावे, भारनियमन बंद करावे, विदर्भातील कोळशावर आधारीत नवीन १३२ वीज प्रकल्पाची मान्यता रद्द करावी, महिलांवरील माईक्रोफायनान्सचे कर्ज संपवावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.यावेळी विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संयोजक राम नेवले, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अरुण केदार, पुरुषोत्तम पाटील, अयुबभाई कच्छी, रफिक रंगरेज, मितीन भागवत, अनिल ठाकुरवार, अ‍ॅड. अरुण धोटे, प्रभाकर दिवे, निळकंठ कोरांगे, मसुद अहमद, राजेंद्र झोटींग, रंजना मामर्डे, राजश्री झोटींग यांच्यासह अनेक नेते व्यासपिठावर उपस्थित होते.यावेळी बोलताना अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, स्वतंत्र विदर्भ झाल्यास सक्षम आणि स्वयंपुर्ण स्वतंत्र राज्य निर्माण होणार आहे. राम नेवले म्हणाले, गेली ५७ वर्ष विदर्भ महाराष्ट्रात राहून आणि सोन्याची कोंबडी समजली जाणारी मुंबई सोबत असूनही विदभार्चा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.