जयंत पाटील : राज्यातील जनतेला आता राष्ट्रवादी हा पर्यायभद्रावती : केंद्रात आणि राज्यात असलेले भाजप सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून गेल्या अडीच वर्षांमध्ये ते घोषणा देण्यापलिकडे काहीच करू शकले नाही. अशा घोषणाबाज सरकारविरोधात आंदोलनाच्या माध्यमातून सरकारची निष्क्रियता लोकांच्या नजरेत आणून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले.स्थानिक अभिषेक मंगल कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पाटील बोलत होते. भाजप सरकारच्या कारकिर्दीत शेतकरी व सामान्य माणूस भरडला जात असून आता राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे कार्य तळागाळापर्यंत पोहचवावे, असेही आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.याप्रसंगी मंचावर माजी मंत्री अनिल देशमुख, अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, बाबासाहेब वासाडे, राजेंद्र वैद्य, संदीप गड्डमवार, नितीन भटारकर, मुनाज शेख, शशिकांत देशकर, दीपक जयस्वाल, नितीन नेरकर, सुधाकर रोहणकर, राजेश मत्ते, प्रशांत काळे, सुजीत उपरे, अमोल ठाकरे, महिला राकाँ जिल्हाध्यक्ष बेबी उईके, ज्योती रंगारी आदी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना अत्यंत महत्त्व प्राप्त होणार असून राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांनी कंबर कसून सज्ज राहावे, असे अनिल देशमुख म्हणाले.सदर कार्यक्रमाला १५ तालुक्यातील राष्ट्रवादी युवक पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन संजय ठाकूर यांनी तर आभार मुनाज शेख यांनी मानले. यानिमित्ताने उपस्थित युवकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलेल्या प्रा. विवेक सरपटवार व बळीराज धोटे यांना संविधानाच्या प्रतिमा देऊन जयंत पाटील व अनिल देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नितीन भटारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मनोज कायरकर, भुपेश वादले, अमोल बडगे, सैयद अनवर, गौरव नंदुरकर, रोहण खुटेमाटे, मंगेश पोटवार, आदित्य भट, दिलीप पिट्टलवार, सिनू गोस्कृल्ला, गुरुदेव जुनघरे, किशोर पडवे, अनुराज चटप, आदित्य भाके, नागेश ईटकर आदींनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)बेरोजगारांची क्रूर थट्टा सुरूमाजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले की, शेती क्षेत्रात हे सरकार पूर्णपणे फसले असून या अडीच वर्षांत शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. त्याचप्रमाणे अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू, अशा थापा मारणाऱ्या भाजप सरकारने त्यांच्या कारकिर्दीत बेरोजगारांची क्रूर थट्टाच केली आहे.त्यामुळे भाजप आता तोंडघशी पडला असून जनतेमध्ये आता स्थान राहिले नाही.
घोषणाबाज सरकारच्या विरोधात रस्त्यावर या!
By admin | Updated: August 30, 2016 00:48 IST