शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

बदल्याचा जीआर रद्द करण्यास विरोध

By admin | Updated: April 20, 2017 01:36 IST

शिक्षकांच्या बदल्याचा विद्यमान शासन निर्णय रद्द करू नये. त्याऐवजी त्यामध्ये काही सुधारणा कराव्यात

शासनाकडे पाठपुरावा करणार : शिक्षण परिषदेचेही आयोजन चंद्रपूर : शिक्षकांच्या बदल्याचा विद्यमान शासन निर्णय रद्द करू नये. त्याऐवजी त्यामध्ये काही सुधारणा कराव्यात. अवघड व सोपे क्षेत्र ठरवण्याचे निकष स्पष्ट करण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे निकष लागत असल्याने ते ठरवून द्यावे. किलोमीटर, बस, रस्ता फक्त या आधारावर अवघड न ठरवता सर्व मुद्यांचा विचार करून ठरवावे, असे बदल्या व इतर प्रलंबित समस्याबाबत शिक्षक हिताचे अनेक ठराव महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पारित करण्यात आले. शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा व शिक्षण परिषद यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे झाली. याप्रसंगी माजी मंत्री मनोहर नाईक, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, पुसद पंचायत समितीचे सभापती देवबाराव मस्के, शिक्षक समितीचे राज्य नेते मारूती सावंत, प्रदेशाध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य कार्याध्यक्ष बालाजी पंडागळे, विदर्भ अध्यक्ष राजेश दरेकर, राज्य संघटक ग.नु.जाधव, चंद्रपूरचे हरीश ससनकर आदी उपस्थित होते. या बैठकीत संपूर्ण बदली प्रक्रियेचे वेळापत्रक लावण्याची मागणी करण्यात आली. त्यामध्ये काही ठिकाणी खूप दिरंगाई होत आहे. यापूर्वी अवघड क्षेत्रात केलेली सेवा ग्राह्य धरावी, त्याची पुन्हा अवघडमध्ये बदली करू नये. तीन वर्षे दुर्गम ची यादी जाहीर करून ज्यांची सुगममध्ये जाण्याची इच्छा नाही, त्यांची नावे यादीतून वगळून खालच्यांना संधी देण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीसारखे राज्यातील काही तालुके संपूर्ण अवघडमध्ये येतात. त्या तालुक्यांना अवघड क्षेत्र घोषित करावे. प्राधान्यवाले भाग-१ ची यादी करून नाकारणाऱ्यांना यादीतून वगळावे, इतरांना संधी द्यावी. अश्याने पूर्णपणे रिक्त होणारी पदे आधी जाहीर करावी.जिल्हा व तालुका अंतर्गत बदली धोरण ठरवताना संघटना प्रतिनिधींना बोलवावे. पती - पत्नी एक युनिट समजून एकावर अन्याय होणार आहे. याकरिता दोघांनाही बदली मागण्याचा व नाकारण्याचा अधिकार असावा, अशा काही पर्यायांर चर्चा करण्यात आली. पती खाजगी व्यवसाय, शेती करीत असेल तर त्यांनाही प्राधान्य द्यावे. अवघडच्या यादीवर जिल्हा व विभाग स्तरावर दाद मागण्याचा अधिकार मिळावा. अश्याप्रकारे बदली शासन निर्णयावर दुरुस्त्या पुरोगामी संघटनेने प्रस्तावित केल्या आहेत. (प्रतिनिधी) सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा विषय शिक्षक पदस्थापना करताना जिल्हा खुला करावा. नांदेड, गोंदिया, वणी येथे एकस्तर वेतनश्रेणी व घरभाडे भत्ता लागू करावा. कर्मचारी विमा योजना व कॅशलेस मेडिक्लेम योजना तत्काळ लागू करावी आदी ठराव पारित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या ओम साळवे, प्रभाकर भालतडक, देविदास मडावी, नरेंद्र डेंगे यांनी मांडल्या.