भद्रावती : गेल्या तीन महिन्यांपासून मासीक वेतन न मिळाल्याने युनिक सेक्युरिटी सर्व्हीस एम्टा खदान बरांज (भद्रावती) अंतर्गत कार्यरत १२८ सुरक्षारक्षकांनी थकीत वेतनासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबतचे निवेदन युनिक सेक्युरिटी सर्व्हीस तसेच प्रबंधक अधिकारी एम्टा खाण यांना देण्यात आले आहे. युनिक सेक्युरिटी सर्व्हीस एम्टा खदान बरांज अंतर्गत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना फेब्रुवारी २०१५ पासून मासीक वेतन मिळाले नाही. याबाबतचे निवेदन युनिक सेक्युरिटी सर्व्हीस तथा प्रबंधक अधिकारी एम्टा खदान यांना देण्यात आले होते. परंतु येथील अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही कार्यवाही न केल्यामुळे २३ एप्रिल पासून सुरक्षारक्षकांनी एम्टा प्रवेशद्वाराजवळ कामबंद आंदोलनाला सुरुवात केली असून रविवारी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. एम्टा खाणीकडून बील न मिळाल्याने तुमचे पगार देवू शकत नाही, असे युनिक सेक्युरिटी सर्व्हीस एम्टा खाण बरांजचे कार्यभार सांभाळीत असलेले राजू सिंग तथा या संस्थेचे मालक मिश्रा सांगत आहेत.गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून एम्टा खाणीचे काम बंद आहे. त्यामुळे याठिकाणी असलेली मशिन होलपॅक कोळसा डोजर, विलडोजर, हॅड्रा, वालवो, डिझलपंप, वॉटरपंप इत्यादी वस्तूंची देखरेख सुरक्षारक्षकच करीत आहे. तरीही सुरक्षा रक्षकांना मासिक वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. कामबंद आंदोलनात सदाशिव चिकाने, प्रदीप आप्रेटवार, नारायण धारणकर, मनोज तुराणकर, योगेश पारखी, मंगेश बदखल, भारत मेश्राम, प्रशांत देठे, विशाल चरपल्लीवार, चंदू लांडगे, निलेश चोपकर, संजय देरकर, उमाकांत कायरकर व अन्य सुरक्षागार्ड सहभागी झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
एम्टा खाणीला सुरक्षा देणारे सुरक्षारक्षक वाऱ्यावर
By admin | Updated: April 27, 2015 01:02 IST