शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओ व सहा ग्रामसेवकांची विभागीय चौकशी प्रस्तावित

By admin | Updated: February 3, 2017 01:02 IST

चिमूरचे तत्कालीन बीडीओ विनोद जाधव व सहा ग्रामसेवकांवर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

निलंबित अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी अहवालचंद्रपूर : चिमूरचे तत्कालीन बीडीओ विनोद जाधव व सहा ग्रामसेवकांवर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. तर या प्रकरणात निलंबित असलेले साहाय्यक लेखाधिकारी वासलवार व तांत्रिक अधिकाऱ्यांवर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चिमूर तालुक्यात झालेल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरुन जिल्हास्तरीय चौकशी समितीकडून तपासणी करण्यात आली. समितीने दिलेल्या अहवालावरुन या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर साहायक लेखाधिकारी वासलवार यांना निलंबित करुन गटविकास अधिकारी विनोद जाधव व कंत्राटी तांत्रिक अधिकाऱ्यांना कारणे दाखावा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने ही चौकशी प्रस्तावित करण्यात आली. मग्रारोहयोअंतर्गत चिमूर तालुक्यात सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षात अनेक कामे झाली. या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर स्थायी समितीच्या सभेतही यासंदर्भातील मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदर कामांची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय चौकशी समिती गठीत केली होती. या समितीकडून १३ आॅक्टोबर २०१६ रोजी अहवाल प्राप्त झाला. समितीने चौकशीदरम्यान, निवडक सात ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली होती. चौकशी अहवालाप्रमाणे ग्रामपंचायतींमध्ये ई- टेंडरींग न करणे, विना परवाना गौण खनिज उत्खनन व पुरवठा करणे, आहरण, संवितरण व लेखांकनाची कार्यपद्धती न अवलंबिता देयके निकाली काढणे, साहित्याचा दर्जा न तपासता मोजमाप व मुल्यांकन केले असल्याचे स्पष्ट झाले होते. यासाठी संबंधित ग्रामसेवक, कंत्राटी तांत्रीक अधिकारी, कंत्राटी लेखापाल, साहाय्यक लेखाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नोटीसचे उत्तम असमाधानकारक असल्याने चिमूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी जाधव व साहाय्यक लेखाधिकारी वासलवार यांच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. दरम्यान, वासलवार यांना निलंबित करण्यात आले. तर गदगाव ग्रामपंचायतीचे सचिव एस. बी. राऊत, पुयारदंड व गडपिपरी ग्रा.पं. चे सचिव एल. आर. मिसाळ, मानेमोहाळीचे सचिव बी. एम. पेंदोर, चिचाळा शास्त्रीचे सचिव आर. डी. चांदेकर, मदनापूरचे सचिव व्ही.एच. झिले व खानगाव ग्रा.पं. चे सचिव एम. एन. दुर्गे यांच्यावर सुद्धा विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. कंत्राटी तांत्रीक अधिकारी व साहाय्यक लेखाधिकाऱ्यांवर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आलेला आहे. (शहर प्रतिनिधी)