शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

१०० खाटांचा श्रेणी वर्धन प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 05:00 IST

राजू गेडाम  लोकमत न्यूज नेटवर्क मूल : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मूल तालुक्याबरोबरच जवळपास असलेल्या सावली, सिंदेवाही व ...

राजू गेडाम लोकमत न्यूज नेटवर्कमूल : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मूल तालुक्याबरोबरच जवळपास असलेल्या सावली, सिंदेवाही व पोंभूर्णा तालुक्यातील जनतेलादेखील सोयीचे व्हावे, या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालय मूल येथील रुग्णालयाला श्रेणी वर्धन करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासंदर्भात ३१ जानेवारी २०१२ ला  विशेष बाब म्हणून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. तब्बल नऊ वर्षांचा कालावधी लोटत असतानादेखील हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत धूळखात पडला आहे. १०० खाटांचे श्रेणी वर्धन उपजिल्हा रुग्णालय होण्याच्या दृष्टीने योग्य पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे मत आता व्यक्त केले जात आहे.उपजिल्हा रुग्णालय मूल येथे असलेल्या  ५० खाटांच्या रुग्णालयाचे रूपांतर १०० खाटांमध्ये  करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे  वैद्यकीय अधीक्षक मूल यांनी जिल्हा शल्यचिकित्सक चंद्रपूर यांच्या मार्फतीने मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला. मात्र, १०० खाटांचा प्रस्ताव आजही धूळखात असल्याचे दिसून येते. लोकसंख्या वाढतच असून आजच्या स्थितीत मूल तालुक्याची लोकसंख्या एक लाख १४ हजार ६११ आहे.  मूल तालुक्यासह  परिसरातील सावली, सिंदेवाही व पोंभूर्णा तालुक्यांची एकूण लोकसंख्या ४ लाख ६४ हजार ५३६ आहे.  ही बाब लक्षात घेता मूल येथे १०० खाटाचे श्रेणी वर्धन उपजिल्हा रुग्णालय स्थापन होणे गरजेचे आहे. ही मागणी करण्यात आली, त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी १ मार्च २०१२ ला उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर यांना पत्र पाठवून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याविषयी १६ मुद्द्यांसह संचालनालय मुंबईला प्रस्ताव सादर करण्याविषयी कळविले होते. तेव्हा उपसंचालकांनी सविस्तर प्रस्ताव १९ मार्च २०१२ ला प्रस्ताव सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे. 

आरोग्यमंत्री सकारात्मकमूल येथील १०० खाटांच्या वाढीव उपजिल्हा रुग्णालयाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली असता याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावाबाबत सविस्तर कळवावे, जेणेकरून मान्यता देणे सोयीचे होईल, असे म्हटले आहे. मूल तालुक्यात जनतेच्या हितासाठी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणे गरजेचे आहे. रुग्णालय झाल्यास वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वाढतील. त्याचबरोबर वैद्यकीय सेवेला बळ मिळू शकते. याकडे आपण विशेष लक्ष घालणार असल्याचे माजी आमदार देवराव भांडेकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल