शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश देवतळे, नंदू नगरकर यांच्या निष्कासनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 23:53 IST

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंंध्येला येथील गांधी चौकातील ध्वजारोहण कुणी करावे, हा वाद प्रशासनात गेला. यामुळे प्रशासनाने दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपुगलिया समर्थकांचा मंथन मेळावा : कार्यकर्त्यांनी मांडला ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंंध्येला येथील गांधी चौकातील ध्वजारोहण कुणी करावे, हा वाद प्रशासनात गेला. यामुळे प्रशासनाने दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र बोलावून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गटाचे समाधान झाले नाही. त्यामुळे ऐतिहासिक काँग्रेसचे ध्वजारोहण तहसीलदारांनी केले. या वादाचे पर्यवसान शनिवारी आयोजित पुगलिया समर्थकांच्या मंथन मेळाव्यात उमटले. कार्यकर्त्यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या निष्कासनाचा प्रस्ताव पारित केला. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखाली येथील राजीव गांधी सभागृहात विचार मंथन मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्याचे आयोजन चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस, विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, काँग्रेस सेवादल, महिला आघाडी, युवक काँग्रेस व इंटक संघटनेने केले होते. मेळाव्याला जिल्हाभरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाला व्यासपीठावर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक प्रशांत दानव, अशोक नागापुरे, युवा नेते राहूल पुगलिया, जि.प. सदस्य शिवचंद काळे, विनोद अहिरकर, देवेंद्र बेले, मन्ना द्विवेदी, प्रवीण पडवेकर, चंद्रशेखर पोडे, माजी जि.प. सदस्य वैशाली पुल्लावार, वसंत मांढरे, तारासिंग कलशी, माजी जि.प. सदस्य गोदरू जुमनाके, सर्व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष नंदू नागरकर यांचे निष्कासन करण्यात यावे म्हणून साईनाथ बुच्चे यांनी तर ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांना निष्कासित करण्याचा प्रस्ताव वसंत मांढरे यांनी मांडला. दोन्ही पदाधिकाºयांना निष्कासीत करण्यासाठी उपस्थितांनी हात उंचावून प्रस्ताव पारित केला. संचालन व आभार प्रदर्शन अ‍ॅड. अविनाश ठावरी यांनी केले. काँग्रेसच्या दुसºया गटाची बैठक तुकूम येथे पार पडली. या बैठकीलाही कार्यकर्त्याची हजेरी होती.शेतकºयांसाठी आंदोलन करणार - पुगलियाशेतकरी वर्ग दुष्काळाशी संघर्ष करीत आहे. शासनाने कर्जमाफी केली. परंतु, निकष सुरळीत नसल्यामुळे शेतकºयांत नाराजी आहे. शेतकºयांना न्याय हक्क मिळाला पाहिजे. मात्र राज्य सरकारचे धोरण शेतकºयांना हक्कापासून वंचित ठेवण्याचे आहे. काँग्रेस पक्ष शेतकºयांच्या पाठीशी असून शेतीच्या खरीप हंगाम आटोपताच हक्क प्राप्तीसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दिला.आयात कार्यकर्त्यांना काँग्रेसचे पद नकोकाँग्रेस पक्षाला धर्मनिरपेक्षतेची वर्षापार परंपरा आहे. यासाठी अनेक जुन्या, कर्मठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अन्य पक्षातून आलेल्यांना पक्षातील महत्त्वाचे व संघटनात्मक बांधणीचे पद दिल्याने पक्षाला मजबुती येत नाही. परिणामी प्रामाणिक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होवू नये, म्हणून आयात कार्यकर्त्यांना महत्त्वाचे पद देण्यात येवू नये, अशी भूमिका असल्याचे नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत मांडली.