शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ऐतिहासिक सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर- हाशमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:47 IST

गोंड़कालीन वारसा या स्वच्छता अभियानामुळे पुन्हा उजळून निघाला़ सतत ३३६ दिवस अविरत श्रमदान केल्याने सर्व प्रवेशद्वार व बुरूजांची स्वच्छता झाली़ सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा पुरातत्त्व विभागाने शासनाकडे सादर केला आहे, .....

ठळक मुद्देगोंड़कालीन वारसा या स्वच्छता अभियानामुळे पुन्हा उजळून निघाला़

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : गोंड़कालीन वारसा या स्वच्छता अभियानामुळे पुन्हा उजळून निघाला़ सतत ३३६ दिवस अविरत श्रमदान केल्याने सर्व प्रवेशद्वार व बुरूजांची स्वच्छता झाली़ सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा पुरातत्त्व विभागाने शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे डॉ़ इजहार हाशमी यांनी दिली़ इको-प्रो संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते़यावेळी मंचावर जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, डॉ निखिल दास, इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ़ हाशमी यांनी चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानसोबत संरक्षण भिंतीचे काम पुरातत्व विभागाने सुरु असल्याची माहिती देवून मंजूर होणाच्या मार्गावर असल्याचेही सांगितले़ जिल्हाधिकारी सलिल यांनी शहराच्या विकास योजनांची माहिती दिली़इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे म्हणाले, किल्ला स्वच्छता दरम्यान नागरिकांचे सहकार्य मिळाले़ शहरातील ऐतिहासिक पर्यटन विकासाच्या दृष्टीने हेरीटेज वॉक आयोजित करावे़ किल्ल्यास लागून होणारे संरक्षण भिंतीचे बांधकाम आणि आतील भागाचा वापर 'सायकल ट्रेक' म्हणून विकसित करण्याची गरजही त्यांनी नमूद केली़चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्याचे स्वच्छता अभियान १ मार्च २०१७ पासुन सुरू करण्यात आले़ या अभियानाला ३३८ दिवस पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले़ गोंडराजांनी बांधलेला भक्कम आणि मजबुत किल्ला कसा दूरवस्थेत होता़ स्वच्छतेनंतर कसे बदल झाले, हे समजावून सांगण्यासाठी छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात आली होती. यावेळी अशोकसिंह ठाकूर अ‍ॅड़ विजय मोगरे, अभय पाचपोर, डॉ जयंत वडतकर, विजय चंदावार, रमेश मूलकलवार, हरीश ससनकर डॉ़ देवईकर, डॉ़ पालीवाल, दीपक जेऊरकर, सदानंद खत्री, प्रा़ सुरेश चोपणे, डॉ़ योगेश दुधपचारे, प्रा़ धोपटे, प्रदीप अड़किने, प्रशांत आर्वे, प्रा. विजय बदखल, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कार, संपत चव्हाण, वर्षा खरसाने, मनोहर टहलियानी, अनिल दहगावकार, धनंजय तावड़े, उमाकांत धांडे आदी उपस्थित होते़