शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात प्रचाराची धूम

By admin | Updated: February 11, 2017 00:32 IST

जिल्हयात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे वारे आता चांगलेच जोमात वाहू लागले आहेत.

कॉर्नर व प्रचार सभेला ऊत : मतदानासाठी १७ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्यचंद्रपूर : जिल्हयात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे वारे आता चांगलेच जोमात वाहू लागले आहेत. मतदानाला अगदी सहाच दिवस शिल्लक असल्याने प्रचाराला वेग आला आहे. ठिकठिकाणी उमेदवारांच्या कॉर्नर सभा, पक्षांच्या प्रचार सभा सुरू आहेत. दरम्यान, मतदारांना मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या १७ ओळखपत्रापैकी कुठलेही एक ओळखपत्र असणे अनिवार्य असल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असून शासकीय यंत्रणाही निवडणुकीसाठी सज्ज होत आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी १६ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. म्हणजेच प्रचारासाठी आता केवळ पाचच दिवस उमेदवारांकडे शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी तन-मन-धनाने प्रचारात उडी घेतली आहे. कार्यकर्तेही रात्रंदिवस निर्वाचन क्षेत्रात फिरताना दिसून येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार सभा जिल्ह्यात सुरू आहेत. काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांच्याही विविध ठिकाणी सभा होत आहेत. एकूणच प्रचाराला आता चांगलाच वेग आल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, दुसरीकडे शासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी दररोज दिशानिर्देश केले जात आहे. आयोगाने निर्देशित केल्यानुसार मतदारांना निवडणूक ओळखपत्र व मतदान चिठ्ठी देण्यात आलेली आहे. मतदान करताना ज्या मतदारांना फोटो ओळखपत्र दाखवणे शक्य नाही, अशा मतदारांना फोटो असलेली मतदार चिठ्ठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. परंतु, ज्या मतदाराचे नाव मतदार यादीत आहे. मात्र छायाचित्र ओळखपत्र नाही. अशा मतदारांनी ओळख पटविण्यासाठी खालील पैकी कुठलाही पुरावा दाखविणे अनिवार्य व बंधनकारक आहे. त्यामध्ये पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र व राज्य सरकारचे तसेच सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्यसंस्था व खाजगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना निर्गमीत केलेले ओळखपत्र, बँक, पोस्ट आॅफिस यांनी फोटो सहीत निर्गमीत केलेले पास बुक, पॅनकार्ड, आधार कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार कार्यक्रम अंतर्गत निर्गमीत केलेले फोटो असलेले जॉबकार्ड, फोटो असलेले आरोग्य विमा योजनेचे स्मार्ट कार्ड व सेवानिवृत्तीचे फोटो असलेले दस्ताऐवज, स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो असलेले ओळखपत्र, जातीचे फोटोसहीत निर्गमित केलेले प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले फोटोसह अपंगत्वाचा दाखला, मालमत्तेचे फोटोसहीत कागदपत्रे, शस्त्र परवाना, निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्ती याचा फोटो असलेले प्रमाणपत्र, वयस्कर निवृत्ती वेतनधारक अथवा त्यांच्या विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र व शिधापत्रिका यापैकी कुठलेही फोटो ओळखपत्र मतदान करतेवेळी ग्राह्य धरण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.या निवडणुकीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र निवडणुकीत दारुचा महापूर वाहतो, असा अनुभव असल्याने पोलीस अवैध दारू विक्रीवर करडी नजर ठेवून आहे. (शहर प्रतिनिधी)१६ फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटीजिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येत असलेल्या क्षेत्रामधील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी १६ फेब्रुवारी गुरुवारला सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. सदर सार्वजनिक सुटी ज्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात निवडणूका घेण्यात येत आहेत, त्याच कार्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे इत्यादींना लागू राहील. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील महानगर पालिका, नगर पालिका क्षेत्र, नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रात तसेच बँका इत्यादीना ही सुटी लागू होणार नाही.