हंसराज अहीर : सिनाळा प्रकल्पग्रस्तांना धनादेश वितरणलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिनाळा कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्यास अनेक तांत्रिक व कायदेशीर अडचणी होत्या. त्याबाबत अनेकदा भाष्यही केले गेले. प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर असतांनाच या अडचणी निस्तारण्यास विलंब लागल्यानेच मोबदल्याचे धनादेश विलंबाने दिल्या जात आहेत. याबद्दल खंत व्यक्त करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मोबदल्यापोटी मिळणाऱ्या या पैशाचा विनीयोग भावी जीवन सुखकर होईल अशा पद्धतीने करावे, हे पैसे गुंतवतांना यातुन अधिकाधिक लाभ मिळेल अशी व्यवहार भूमिका स्वीकारावी, शेती पुरक व्यवसाय ज्यात दुग्धीत्पादन, भाजीपाला उत्पादन, शेळीपालन व विविध जोडधंदे उभारून या पैशातून आणखी अर्थप्राप्ती होईल असे नियोजन या प्रकल्पग्रस्त कुटुंबियांनी करावे, असे भावनिक आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.स्थानिक शासकीय विश्रामगृहात गुरुवार दि. १ जून रोजी सिनाळा खाण प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या मोबदल्याचे धनादेश वितरण करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास भाजपा नेते विजय राऊत, महापौर अंजली घोटेकर, वेकोलि चंद्रपूरचे क्षेत्रिय महाप्रबंधक आभास सिंह, मनपा आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा भाजप गटनेते वसंता देशमुख, राहुल पावडे, लोकचंद कापगते, हंसराज रायपुरे, पुनम तिवारी आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर व वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंह यांचे हस्ते प्रकल्पग्रस्त शेतकरी सखाराम हजारे, संदीप सत्रे, मनोज रोहनकर, दिलीप पायघन, रत्नदिप रायपुरे, राजेंद्र रायपुरे, इंद्रजीत रायपुरे व अन्य प्रकल्पग्रस्तांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
प्रकल्पग्रस्तांनी शेतीच्या पैशातून शेतीपूरक व्यवसाय उभारावा
By admin | Updated: June 2, 2017 00:43 IST