शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांनी कोळसा वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:47 IST

गोवरी, पोवनी, चिंचोली येथील ग्रामस्थांनी पोवनी-गोवरी कॉलनीकडून जाणारी वेकोलितील कोळसा वाहतूक शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून बंद पाडली. यामुळे या रस्त्यावर ट्रकांची रांग लागली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गोवरी, पोवनी, चिंचोली येथील ग्रामस्थांनी पोवनी-गोवरी कॉलनीकडून जाणारी वेकोलितील कोळसा वाहतूक शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून बंद पाडली. यामुळे या रस्त्यावर ट्रकांची रांग लागली होती.गोवरी, पोवनी या वेकोलिच्या कोळसा खाणीत कोळसा खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येत असल्याने वेकोलिच्या खदानीतील दगड थेट शेतात पडत आहेत. वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून नवीन नाले तयार केले. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. परिसरात कोळशाच्या धुळीमुळे आरोग्यच धोक्यात आले आहे. त्यामुळे गावकरी संतापले आहेत. दरम्यान, गोवरी, पोवनी, चिंचोली येथील गावकऱ्यांनी वेकोलिची कोळसा वाहतूकच आज रोखून धरली. जोपर्यंत वेकोलि प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोवनीचे सब एरिया मॅनेरज सी. पी. सिंग यांनी आंदोलनस्थळी येऊन प्रकल्पग्रस्त गावकºयांशी चर्चा केली. वेकोलिच्या क्षेत्रीय कार्यालयात अधिकाºयांसमक्ष प्रकल्पग्रस्त गावकºयांच्या मागण्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तब्बल दोन तास अडवून धरलेली वेकोलिची कोळसा वाहतूक पूर्ववत करण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य सुनील उरकुडे, चिंचोलीचे सरपंच अर्जुन पायपरे, गोवरीच्या सरपंच पोर्णिमा उरकुडे, पोवनीच्या सरपंच सरला फुलझेले, पोलीस पाटील बंडू चिडे, अशोक घोटेकर व गोवरी, पोवनी, चिंचोली येथील प्रकल्पग्रस्त गावकरी उपस्थित होते. यावेळी कोणतीही अनुसूचित घटना घडू नये म्हणून राजुराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील झुरमुरे ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित होते.