शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:02 IST

पोवनी - ३, चिंचोली रिकॉस्ट यासह सात कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला मिळणार आहे. त्या संदर्भातील पत्र कोळसा मंत्रालयाने निर्गमित केले आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची मध्यस्थी : पोवनी ३, चिंचोली रिकॉस्टसह सात प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोवनी - ३, चिंचोली रिकॉस्ट यासह सात कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला मिळणार आहे. त्या संदर्भातील पत्र कोळसा मंत्रालयाने निर्गमित केले आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रकल्पासंदर्भातील नव्या कायद्यानुसार (एक्स.एल.ए.आर.आर.) मिळणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत प्रकल्पग्रस्त बांधवांमध्ये वेकोलि प्रशासनाने संभ्रम पसरविला होता. कोणताही वेकोलि अधिकारी याबाबत प्रकल्पग्रस्तांचे समाधान करू शकत नव्हता. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा मोबदल्यासाठीचा संघर्ष कायम होता. प्रकल्पग्रस्तांमध्ये वाढीस लागलेल्या असंतोषाची केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गंभीर दखल घेतली.ज्या प्रकल्पात सी.बी. अ‍ॅक्ट १९५७ अन्वये १४ (१) च्या प्रावधानानुसार जमिनीच्या मोबदल्याबाबत करार कार्यवाही पुर्ण झाली आहे, तसेच ज्या ठिकाणी करारनामे झालेले नाहीत, मात्रा सेक्शन ९ ची अधिसूचना यापूर्वीच लागू झाली आहे, अशा प्रकल्पग्रस्तांवर मोबदल्याबाबत अन्याय होऊ देणार नाही, असे अभिवचन ना. हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले होते. याबाबत ना. अहीर यांनी केंद्रीय कोळसा मंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना प्रति एकरी ६, ८ व १० लाख रूपयांचा मोबदला मान्य करणारे कोळसा मंत्रालयाचे पत्र ३० मार्चला निर्गमित करण्यात आले आहे. कोळसा मंत्रालयाच्या या अध्यादेशामुळे सात प्रकल्पातील शेतकºयांना जुन्या करारानुसारच मोबदल्याची राशी मिळणार असल्याची माहिती ना. हंसराज अहीर यांनी दिली आहे. प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणासंदर्भातील या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षांपासूनच संघर्ष थांबला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रकल्पग्रस्तांनी केला ना. अहीरांचा सत्कारया मंत्रालयीन निर्णयामुळे पौनी - ३, चिंचोली रिकॉस्ट या प्रकल्पासह सास्ती यु/जी, निलजई, उकणी अशा एकूण सात प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना लाभ मिळाल्याने या सर्व प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी ना. हंसराज अहीर यांचा राजुरा येथील एका कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी आ. अ‍ॅड. संजय धोटे, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, जिल्हा उपाध्यक्ष अरूण मस्की, जिल्हा महामंत्री राहुल सराफ, तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे आदी उपस्थित होते.