शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन प्रिटिंग प्रेस पाडणाऱ्यांचा निषेध

By admin | Updated: June 30, 2016 01:11 IST

मुंबई दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस भाडोत्री गुंड्यांच्यासाह्याने बुलडोजरने शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास पाडण्यात आले.

ठाणेदारांना निवेदन: सर्वत्र तीव्र पडसादकोठारी : मुंबई दादर येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस भाडोत्री गुंड्यांच्यासाह्याने बुलडोजरने शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास पाडण्यात आले. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोठारीत भारिप-बमसंच्यावतीने ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांना निवेदन सादर करून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.या निवेदनामध्ये घटनेस जबाबदार असणाऱ्या रत्नाकर गायकवाड व त्याच्या ५०० ते ६०० भाडोत्री गुंडाना अटक करा. दादर मुंबई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व सहा. पोलीस निरीक्षकास तात्काळ निलंबीत करा. पिपल्स इव्युवमेंट ट्रस्ट मध्ये हस्तक्षेप करण्यास मज्जाव करावा. खोटी जाहीरात छापणाऱ्या दै. महानगर संपादकाला अटक करावी. या घटनेची जबाबदारी या मुख्यमंत्र्यांनी स्विकारून पदाचा राजीनामा द्यावा. डॉ. आंबेडकराच्या ऐतिहासिक वास्तुत उद्धवस्त करणाऱ्यांना कडक कारवाई करावी अशा मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन भारिप बमसं जिल्हा युवक आघाडी महासचिव धिरज बांबोडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले . यावेळी उपसरपंच अमोल कातकर, सिद्धार्थ शंभरकर, राहुल रामटेके, निलेश खोब्रागडे, संदीप मावलीकर, सुमित उराडे, फिरोज पठाण, राजु चौधरी, आर.के. जिल्लेवार, आकाश कांबळे, अनिल वनकर, सचिन रामटेके तसेच भरिप बमसंचे कार्यकर्ते तसेच बौद्ध समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)