शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

अत्याचाराचा गडचांदुरात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:02 IST

कठुआ व उन्नाव आणि देशातील इतर ठिकाणी अल्पवयींन मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गडचांदुरात गुरुवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला.

ठळक मुद्देशेकडो नागरिकांचा सहभाग :आरोपींवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कठुआ व उन्नाव आणि देशातील इतर ठिकाणी अल्पवयींन मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गडचांदुरात गुरुवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला. शहरातील नागरिक व विद्यार्थी हजारोंच्या संख्येने मार्चमध्ये सहभागी झाले होते. शिवाजी चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून, बसस्थानक महात्मा फुले चौक ते गांधी चौकापर्यंत मार्च काढण्यात आला होता.यावेळी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे,गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. अनिल चिताडे, विट्ठल थीपे, नगरसेवक नीलेश ताजने, माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान, नासिर खान, के.के. श्रीवास्तव, बल्लारपूर येथील थूल, पवन भगत, शेख हाफिज भाई, शरद जोगी, सागर ठाकूरवार, सुरेखा गोरे, शांता मोतेवाड, विक्रम येरणे, प्रा. अशोक डोईफोडे, शशांक नामेवार, सिद्धार्थ गोसावी, कय्युम खान, उद्धव पुरी, बंडू वैरागडे, मुमताज अली, राजू कादरी, अनिस कुरेशी, आसिफ लांबा, शेख अहेमद, शेख सिराज, नसरुद्दीन शेख, शेख अजिम आदी मान्यवर उपस्थित होते.गांधी चौकात घेण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे संचालन रफिक शेख, प्रास्तविक प्रा. आशिष देरकर यांनी केले. देशात महिलांवर अत्याचार वाढत असल्याने उपस्थितांनी सरकारचा कठोर शब्दात निषेध केली. यावेळी ठाणेदार विनोद रोकडे यांना राष्ट्रपतीच्या नावाने निवेदन देण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व जाती-धर्माचे नागरिक, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.उन्नाव, कठुआ घटनेविरुद्ध कॅन्डल मार्चवरोरा : देशभरात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या कठुआ व उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेटी बचाओ समिती तसेच शहरातील सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला. महिला सुरक्षेबाबतीत सरकार असंवेदनशील असल्याचा आरोपही यावेळी करण्यात केला. जम्मू काश्मीरच्या कठुआ येथील चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील मुलीवरील बलात्कार झाला. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ शहरात वेगवेगळ्या भागात कँडल मार्च काढण्यात आले. हातात मेणबत्ती व निषेधाचे फलक घेऊन शहरातील सर्वधर्मीय नागरिक मार्चमध्ये सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रगीताने कॅण्डल मार्चचा समारोप करण्यात आला.