शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

शाळा-महाविद्यालयात कार्यक्रमांची रेलचेल

By admin | Updated: August 31, 2015 00:58 IST

जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयात मंत्रिमंडळाचे गठन, वृक्षारोपण, वर्गखोल्यांचे उदघाटन आदी कार्यक्रम पार पडले. प्रियदर्शनी कन्या विद्यालयात मंत्रिमंडळ

चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयात मंत्रिमंडळाचे गठन, वृक्षारोपण, वर्गखोल्यांचे उदघाटन आदी कार्यक्रम पार पडले.प्रियदर्शनी कन्या विद्यालयात मंत्रिमंडळचंद्रपूर: समता शिक्षण विकास मंडळ चंद्रपूरद्वारा संचालीत प्रियदर्शनी कन्या विद्यालय, बगड खिडकी, चंद्रपूर येथे सत्र २०१५-१६ या शालेय सत्रासाठी शालेय मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका आशा दाते होत्या, तर निवडणूक नियंत्रक म्हणून उमाकांत पिसे यांनी काम पाहिले. शालेय मंत्रीमंडळात मुख्यमंत्री म्हणून आलिया जिमल शेख, उपमुख्यमंत्री अर्चना रमेश प्रजापती, उन्नती योगीराज अंगडवार, क्रिमडामंत्री सुफिया शेख स्वच्छतांमंत्री गुलिस्ता पठाण, आरोग्यमंत्री कंचन राजपूत पर्यावरण मंत्री सायमानाज शेख, सांस्कृतीक कार्यक्रम मंत्री किरणदिप कौ. शालेय शिस्त व कामकाजमंत्री नंदीनी बार्गेलवार, शालेय पोषण आहार मंत्री आरती डहाट याची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षक उमाकांत पिसे यांनी काम पाहिले. राणी राजकुंवर शाळेत ई-लर्निंग वर्गाचे उद्घाटनचंद्रपूर: राणी राजकुंवर भगिनी समाज व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार रोटरी क्लबचे डॉ. निखील किबे यांच्या हस्ते गुरूवारी ई लर्निंग वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी रोटरी क्लबच्या अध्यक्ष अनुपा भ्रामरी आणि सर्व पदाधिकारी तसेच राणी राजकुंवर भगिनी समाजाच्या अध्यक्षा सुनिता पुराणिक, उपाध्यक्षा नंदीनी देवईकर व इतर पदाधिकारी शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत यशचंद्रपूर: क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या वतीने सन २०१५-१६ या वर्षातील जिल्हास्तरीय सुब्रतो कप फूटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेनी भाग घेतला. या स्पर्धेमध्ये चांदा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी शिशिर दुधे, शांतनू ठेंगणे, श्रेयश हेपट, अमय कथले, रितेश सोनेकर, शशांक बॅनर्जी कार्णिक अन्प्रेड्डीवार, रोहीत रॉय, सागर मून, अनिकेत वांढरे, रितीक घुटे, रमन बिसोन, वैष्णव वनकर, निखिल पोहाणे, मानस शिंदे या खेळाडूंच्या चमूने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत घवघवीत यश प्राप्त केले व जिल्ह्यात प्रथमस्थान पटकाविला. देवनील विद्यालयात मंत्रिमंडळचंद्रपूर: विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालीत देवनिल विद्यालय टेकाडी येथे मुख्याध्यापक राजेश सावरकर यांच्या मार्गदर्शनात सक्रिय शाळा उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक सत्र २०१५-१६ करिता शालेय विद्यार्थी मंडळाची लोकशाही पद्धतीने निवड करुन स्थापना करण्यात आली. यात मुख्यमंत्री म्हणून भूपेश भोयर यांची एकमताने निवड करण्यात आली, तर उपमुख्यमंत्री अपूर्वा जेंगटे, क्रीडामंत्री दीपक जराते, सांस्कृतिकमंत्री सागर गावतूरे, अर्थमंत्री गायत्री वाकडे, गुणवत्ता विकासमंत्री धिरज निकुरे, आरोग्यमंत्री यश येरमे, पर्यावरण व पर्यटनमंत्री कुणाल निमगडे, संरक्षणमंत्री नीलेश तिवाडे, नियोजनमंत्री गौरव आवळे, शिस्तमंत्री श्रेयश रामटेके यांची निवड करण्यात आली.