शहरं
Join us  
Trending Stories
1
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
2
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
13
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
14
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
15
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
16
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
17
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

प्राध्यापकांचा वनवास संपता संपेना

By admin | Updated: January 1, 2015 22:59 IST

राज्यात २००१ या वर्षापासून कायम विनाअनुदानीत तत्वावर लाखो संस्थांना शाळा महाविद्यालये देण्यात आलीत. राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळावी व उच्च शिक्षण घेण्यासाठी

वनसडी : राज्यात २००१ या वर्षापासून कायम विनाअनुदानीत तत्वावर लाखो संस्थांना शाळा महाविद्यालये देण्यात आलीत. राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळावी व उच्च शिक्षण घेण्यासाठी परिसरातच महाविद्यालय असावे, असा त्या मागील उद्देश होता. अशा महाविद्यालयांमध्ये डोनेशन देऊन प्राध्यापकांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. मात्र आयुष्याची १० वर्षे खर्ची घातली तरी त्यांचा वनवास संपलेला नाही. महाविद्यालयांना अनुदानच नसल्याने प्राध्यापकांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. वयाची चाळीशी ओलांडणाऱ्या प्राध्यापकांना विद्यादानाचे पवित्र काम केल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतात मजुरी, हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करावी लागत आहे. काहींनी तर फावल्या वेळात चहाटपरी चालविणे पसंत केले आहे. तर अनेकांना छोटे-मोठे व्यवसाय करुन आपले उपजिविका करावी लागत आहे. कधी तरी अनुदान मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.कित्येक प्राध्यापक शिकविणी आटोपल्यानंतर शेतात जाऊन श्रम करताना दिसतात. शाळेत जाऊन पोट भरणार नाही, याची त्यांना जाणिव असल्याने वेगवेगळे उद्योग करून त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. आजपर्यंत प्राध्यापकांच्या संघटनेने जवळपास २००-२५० आंदोलने केलीत. मात्र आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडले नाही. विद्यादानाचे पवित्र काम करुन देशातील चांगले नागरिक घडविणाऱ्या शिक्षकांची ही अवस्था पाहून अनेकांनी या पेशाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. आज राज्यातील २० हजार शिक्षकांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. या प्राध्यापकांना न्यायाची अपेक्षा आहे. विना अनुदानित महाविद्यालयांना तातडीने अनुदान द्यावे व गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा वनवास कुठे तरी थांबवावा, प्राध्यापकांची मागणी आहे. (वार्ताहर)