शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वायगाव हळद पिकाचे यंदा उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

शहरातील प्रामुख्याने भोई समाजातर्फे भद्रावती शहर व परिसरात वायगाव हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या परिसरातील बरीच शेतजमीन उद्योगांसाठी संपादित झाली. शहराचा व्यापही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतीच्या उत्पादनाखाली भूभाग कमी झाला आहे. त्यामुळे साहजिकच हळद शेतीचे क्षेत्र घटले आहे. कृषी सेवा केंद्रातून हळदीची कोणतीही बिजाई मिळत नाही.

ठळक मुद्देलागवड क्षेत्र घटले : शेतीची जमीन उद्योगांसाठी संपादित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वायगाव हळद संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. मात्र, लागवड क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याने हळदीच्या उत्पादनात यंदा कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.शहरातील प्रामुख्याने भोई समाजातर्फे भद्रावती शहर व परिसरात वायगाव हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या परिसरातील बरीच शेतजमीन उद्योगांसाठी संपादित झाली. शहराचा व्यापही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतीच्या उत्पादनाखाली भूभाग कमी झाला आहे. त्यामुळे साहजिकच हळद शेतीचे क्षेत्र घटले आहे. कृषी सेवा केंद्रातून हळदीची कोणतीही बिजाई मिळत नाही. उत्पादीत हळदीपैकी बिजाईसाठी आवश्यक असलेली हळद वेगळी काढून ठेवून तिचा एखादा झुडपाखाली थंडावा असलेल्या ठिकाणी खड्ड्यात पुरल्या जाते. त्यानंतर वर्षभर सांभाळून ठेवून ती दुसऱ्या वर्षी बिजाईसाठी वापरावी लागते. या कालावधीत काही हळद नष्ट होवून बिजाई कमी आहे. हळदीची पेरणी जून महिन्यात केली जाते. यासाठी कोणतेही यंत्र उपलब्ध नसल्याने ती केवळ मजुरांकडूनच करावी लागते. त्यामुळे उत्पादनखर्चात सातत्याने वाढ होत आहे.फेबु्रवारी महिन्यात ती खोदुन बाहेर काढण्यासाठी मजुरांची मदत घ्यावी लागते. एवढ्यावरच हळदीचे उत्पादन हातात येत नाही. काढलेल्या हळदीला उकळून वाळवून तिला घासल्यानंतरच हळद विक्रीसाठी तयार होते.या शेवटच्या प्रक्रियेसाठीही उत्पादकांना खूप मोठा खर्च येतो. अशा अवस्थेत बाजारपेठात हळदीचे भाव पडल्यास उत्पादकांना आर्थिक तोटा सहजन करावा लागतो.वायगाव हळदीला विदर्भातच राज्यभरात मागणी आहे. मात्र, या पिकाच्या उत्पादनासाठी येत असलेला प्रचंड खर्च, परिश्रमाच्या तुलनेत मिळणारा लाभ फारसा नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात अधिग्रहित झाल्या आहेत. त्यामुळे लागवड क्षेत्राची व्याप्ती कमी झाली. हळद पिकाच्या उत्पादनात यंदाही मोठी घट होण्याची स्थिती आहे.- भारत नागपुरे, हळद उत्पादक शेतकरी 

टॅग्स :agricultureशेती