शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

खरीप पिकांचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या वादळी पावसाच्या जोरदार संततधारेने शेकडो एकरातील धान भुईसपाट झाले आहे. पावसामुळे धान खाली पडल्याने शेतशिवारात पिकाचा सडका वास येत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : बदलत्या वातावरणाचा पिकांवर अनिष्ठ परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धान उत्पादनात पुढे असलेल्या जिल्ह्याला काही दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपल्याने खरीपातील अन्य पिकांना जोरदार फटका बसला आहे. हलके व मध्यम जातीचे धान काही ठिकाणी निसवून कापणीच्या स्थितीत आहे, तर काही ठिकाणी उशिरा लागवड केलेले धान पीक अतिवृष्टीमुळे सडले. अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या वादळी पावसाच्या जोरदार संततधारेने शेकडो एकरातील धान भुईसपाट झाले आहे. पावसामुळे धान खाली पडल्याने शेतशिवारात पिकाचा सडका वास येत आहे. कित्येक शेतकरी धानासह तूर पिकावर महागडी औषधे फवारणी करताना दिसत आहेत. तीन वर्षांचा दुष्काळ झेलत हिम्मतीने शेतकºयांनी यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना यावर्षीही पावसाचा फटका बसला आहे. जून महिन्यात पावसाच्या अत्यल्प हजेरीने शेतकºयांची पेरणी, रोवणी अर्धी लांबली होती. जुलै महिन्यात समाधानकारक पावसाला सुरूवात झाली खरी. परंतु पावसाने काही ठिकाणीच हजेरी लावली. सुरूवातीच्या कालखंडात योग्यवेळी पाऊस न झाल्याने बºयाच शेतकºयांना रोवणी पूर्ण करता आली नाही. आॅगस्ट महिन्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे निंदनासह शेती कामांना खºया अर्थाने पुन्हा वेग आला होता. त्यानंतर मात्र संततधार पावसामुळे धान कमी पण तण जास्त, अशी स्थिती झाल्याने यावर्षी शेतकºयांच्या खर्चात वाढ झाली आहे.सप्टेंबर महिना अखेरपर्यंत समाधानकारक पावसामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, सोयाबीन कापणीच्या वेळीही पावसाची रिपरिप लवकर बंद न झाल्याने काही तालुक्यातील धान पीक जागेवर सडले. आजही शेतशिवारात त्याची दुर्गंधी पसरत आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला आहे. धानाला तुडतुडा, अळी, करपा, कडाकरपासारख्या रोगांनी तर तूर पिकावर पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.निसवणाच्या अवस्थेतील धानाच्या लोंबी पूर्णत: पांढरी होत असून त्याचा परिणाम दाने भरण्यावर झाला आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात दाणे पोचटच असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाचे काही अधिकारी उंटावरून शेळ्या हाकत असल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना योग्य सल्ला देऊन उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात तरी नुकसान टाळता येऊ शकते. मात्र, त्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून गावागावांत मार्गदर्शन शिबिर सुरू करणे गरजेचे आहे.हमीभाव कागदावरचजिल्ह्यात खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर प्रारंभी पावसाने हजेरी लावली. परंतु काही दिवसांत दीर्घ उसंत घेतली होती. त्यामुळे शेतकºयांच्या पेरणीचे नियोजन चुकले. नंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. सप्टेंबर महिन्यात आलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकºयांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. एकीकडे पाण्यामुळे कपाशीची गळती तर दुसरीकडे परतीच्या पावसाने कापणी केलेले सोयाबीन ओले, असे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी मृगाच्या पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र, नंतर दडी मारली. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसाने शेतकºयांचे स्वप्न भंगले. सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर तालुक्यात हलके धान निघाले. १८ ते २० पण समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकरी हैराण झाला. शेतकºयांच्या शेतमालात कमी प्रमाणात ओलसर असला तरी प्रमाण अधिक असल्याचे सांगून भाव कमी देत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे दररोज १५०० पोती माल खरेदी केला जात आहे. १४ आॅक्टोबरपासून सोयाबीन खरेदीला सुरूवात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीने ३ हजार पोती सोयाबीन खरेदी केली आहे. मात्र, हमीभाव कागदावरच असल्याचा आरोप शेतकºयांनी केला.