शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून १३० खड्ड्यांची निर्मिती

By admin | Updated: May 27, 2017 00:37 IST

पाणी फाऊंडेशनपासून प्रेरणा घेऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी श्रमदानातून १३० खड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

बीडीओचा पुढाकार : पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करणार लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : पाणी फाऊंडेशनपासून प्रेरणा घेऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी श्रमदानातून १३० खड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ४ कोटी वृक्ष लागवड प्रकल्पामध्ये हा एक प्रयत्न केला जात आहे. त्याकरिता कोरपना पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या काही दिवसांवर पावसाळा आला आहे. त्यावेळी पंचायत समितीकडून वृक्षलागवडीवर भर दिला जाणार आहे. त्याच धर्तीवर आगामी वृक्षलागवडीसाठी पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक तसेच आपले सरकार सेवा केंद्रचालक आदींनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्रमदानातून १३० खड्डे तयार केले आहेत. महिला कर्मचाऱ्यांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या भागात जमीनीखाली खडकाचे प्रमाण जास्त असल्याने खड्डे खोदणे कठीण होते. मात्र सर्वांच्या इच्छाशक्तीने काम पार पाडले.येत्या पावसाळ््यात सर्व कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतून कडू लिंब, करंज आदींची दजेदार व मोठी रोपे लावण्याचा मानस आहे. कोरपना हा औद्योगिक तालुका असून तालुक्यात तीन सिमेंट कारखाने आहेत. अंबुजा, अल्ट्राटेक व माणिकगड या सिमेंट कंपन्याकडून ‘ट्री गार्ड’ची मदत मिळाल्यास झाडांचे रक्षण होण्यास मदत होईल. त्यासाठी आम्ही कंपन्यांना विनंती पत्र पाठविणार आहोत.- डॉ. संदीप घोन्सिकर, गटविकास अधिकारी, कोरपनासंविअ डॉ. संदीप घोन्सिकर यांनी राबविलेली योजना स्तुत्य आहे. तालुक्यातील प्रत्येक अधिकाऱ्याने अशा प्रकारे कार्य केल्यास जनतेचा सहभागसुद्धा वाढेल आणि वृक्ष लागवडीस चालना मिळेल.- शाम रणदिवे,सभापती, पंचायत समिती कोरपना