शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फळांच्या राजावर पुन्हा प्रक्रिया

By admin | Updated: June 23, 2014 00:01 IST

कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करुन पिकविलेले आंबे पुन्हा चंद्रपुरातील बाजारात विक्रीस येत आहेत. या आंब्यांचा रंग आणि चव दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच बदलत असल्याने त्यात रसायनाचा वापर करण्यात येत

कार्बाईडचाच वापर : चंद्रपुरात करवाईनंतर सिंदेवाही पर्यायचंद्रपूर : कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करुन पिकविलेले आंबे पुन्हा चंद्रपुरातील बाजारात विक्रीस येत आहेत. या आंब्यांचा रंग आणि चव दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच बदलत असल्याने त्यात रसायनाचा वापर करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चंद्रपुरातील मागील महिन्यात झालेल्या कारवाईनंतर काही व्यापाऱ्यांनी सिंदेवाहीत फळांच्या राजावर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे.येथील वाहतूक कार्यालयासमोर अनेक फळविक्रेते बसतात. तुकूम, दुर्गापूर, शास्त्रीनगर आणि अन्य भागातील नागरिक रस्त्यावर भरणाऱ्या या बाजारातूनच फळ आणि भाजी विकत घेतात. गेल्या काही दिवसांपासून येथून आंबे विकत घेणाऱ्यांना वेगळाच अनुभव येत आहे.येथून विकत घेतलेल्या आंब्यांचा रंगच दुसऱ्या दिवशी काळपट पडत असून, त्याची चवही वेगळी येत आहे. वारंवार असे प्रकार होत आहे. त्यामुळे पुन्हा फळांच्या राजावर प्रक्रिया होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.मागील महिन्यात ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. त्यानंतर चंद्रपुरातील काही फळ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. येथील काही फळ व्यापाऱ्यांनी आपले बस्तान सिंदेवाहीत हलविले असल्याची माहिती आहे. सिंदेवाहीत कॅल्शिअम कार्बाईडमध्ये आंबे पिकवून ते दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी चंद्रपूरसह अन्य गावात विकण्यासाठी पाठविले जात आहे. मागील महिन्यात कृषी उत्पन्न बाजर समितीतील दोन फळविक्रेत्यांच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभाग, महसूल विभाग, वजनमापे आणि पोलिसांनी छापा टाकला होता. कॅल्शिअम कार्बाईडच्या पुड्या टाकलेले जवळपास साडेचार हजार किलो आंबे ताब्यात घेण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या आंब्यांची किंमत ६७ हजार ६७० रुपये इतकी होती. या कारवाईने धास्तावलेल्या काही मोठ्या फळ विक्रेत्यांनी सिंदेवाहीत आपली दुकानदारी पुन्हा सुरू केली आहे. (शहर प्रतिनिधी)