शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी समृद्धीच्या प्रक्रियेला मिळाली बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे विविध उपक्रम राबविले आहे. सामूहिक सिंचन विहीर योजनेअंतर्गत ५२२ प्रस्तावांसाठी १९८३.६० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. मे २०१९ मध्ये योजनेची कामे सुरू करण्यात आली असून जून २०१९ मध्ये १०३ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहे व उर्वरित कामे जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : तीन तालुक्यातील ५९३ विहिरींना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यांच्या पुढाकाराने चांंदा ते बांदा या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्ध किसान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सामूहिक सिंचन विहीर, सामूहिक विहीर दुरूस्ती, सामूहिक कुपनलिका यासह उस्मानाबादी बोकड वाटप, ठिबक सिंचन व आच्छादन योजना, मंडप शेती उच्च भाजीपाला लागवड, पॉलीहाऊस नर्सरी, कृषी अवजारे बँक हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मूल तालुक्यातील ४१, पोंभुर्णा तालुक्यातील ३० तर बल्लारपूर तालुक्यातील १७ गावांमधील ५२२ सामूहिक सिंचन विहिरींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून एकूण १३२४ लाभार्थ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे, अशी माहितीमाजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे विविध उपक्रम राबविले आहे. सामूहिक सिंचन विहीर योजनेअंतर्गत ५२२ प्रस्तावांसाठी १९८३.६० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. मे २०१९ मध्ये योजनेची कामे सुरू करण्यात आली असून जून २०१९ मध्ये १०३ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहे व उर्वरित कामे जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आली आहे. सामूहिक विहीर दुरूस्ती योजनेअंतर्गत २५७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून ५४१ लाभार्थ्यांना या माध्यमातून सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यासाठी १२८.५० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. मे २०१९ मध्ये सदर योजनेची कामे सुरू करण्यात आली असून उर्वरित कामे जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आलेली आहे.सामूहिक कुपनलिका योजनासामूहिक कुपनलिका योजनेच्या माध्यमातून २३ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून ६४ लाभार्थ्यांना या माध्यमातून सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यासाठी ८६.०४ लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. जून २०१९ मध्ये सहा कुपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली असून उर्वरित कामे जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे.उस्मानाबादी बोकड वाटपपशुसंवर्धनाच्या प्रक्रियेला गती प्राप्त व्हावी यादृष्टीने उस्मानाबादी बोकड वाटप योजनेअंतर्गत ३६० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून ६६७ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ३०.८७ लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत १६९ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार