शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार लेखा आक्षेपांवर कार्यवाही शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:48 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विभागात अनुदान योजना राबविल्या जात आहे. यावर वित्त विभागाचे नियंत्रण असते.

ठळक मुद्देलेखा विभाग पांगळा : लेखा परीक्षण ठरतेय कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विभागात अनुदान योजना राबविल्या जात आहे. यावर वित्त विभागाचे नियंत्रण असते. जिल्हा निधी, शासकीय अनुदान खर्चासाठी दरवर्षी लेखा परीक्षण केले जाते. या लेखा परीक्षणाच्या वेळी अनेकजण लेखा आक्षेप नोंदवितात. मात्र आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करण्यात लेखा विभाग अपयशी ठरला असून जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमार्फत गेल्या १५ वर्षात १ हजार ६६५ लेखा आक्षेप प्रलंबित असल्याची माहिती आहे.पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी तिनस्तरीय विभागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जनतेला कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वच्छता, पंचायत, रोजगार हमी, सिंचाई, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समित्यांना विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी दिला जातो.मात्र दिलेल्या निधीचे योग्य उपयोग झाला किंवा नाही यासाठी लेखा परीक्षण केले जाते. ज्यावेळी लेखा परीक्षण होते, त्यावेळी सर्वच पंचायत समित्यांवर लेखा आक्षेप नोंदविले जातात. या लेखा आक्षेपांची पुर्तता करणे लेखा विभागाला गरजेचे असते. मात्र या आक्षेपांची अद्यापही पुर्तता न झाल्याने १५ पंचायत समित्यांमध्ये सन २०००-०१ पासून १ हजार ६६५ लेखा आक्षेप प्रलंबित आहेत. ही आक्षेप निकाली काढण्याची गरज आहे.