शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकेअभावी अडचणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : औद्योगिक व कृषी क्रांती झालेल्या कोरपना व जिवती या तालुक्याच्या मुख्यालयी एकटी राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने नागरीक कमालीचे त्रस्त आहेत. कोरपना तालुक्यात ११३ तर जिवती तालुक्यात ८३ गावांचा समावेश आहे. मात्र या दोन्ही तालुका मुख्यालयी राष्ट्रीयीकृत बँक स्थापन करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.कोरपना व जिवती या तालुकास्थळी ...

ठळक मुद्देकोरपना, जिवतीच्या नागरिकांत रोष : गडचांदूर शहरात एकमेव राष्ट्रीयीकृत बँक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : औद्योगिक व कृषी क्रांती झालेल्या कोरपना व जिवती या तालुक्याच्या मुख्यालयी एकटी राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने नागरीक कमालीचे त्रस्त आहेत. कोरपना तालुक्यात ११३ तर जिवती तालुक्यात ८३ गावांचा समावेश आहे. मात्र या दोन्ही तालुका मुख्यालयी राष्ट्रीयीकृत बँक स्थापन करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.कोरपना व जिवती या तालुकास्थळी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, जि.प. शाळा व मोठी बाजारपेठ आहे. कोरपना, जिवती येथे कार्यरत अधिकारी कर्मचारी, व्यापारी प्राध्यापक वास्तव्यास राहतात. त्यांना राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते असणे अनिवार्य आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने सर्वांना वनसडी, गडचांदूर, आवारपूर, पाटण, कचठाळा, उपरवाही, लखमापूर येथे जाऊन व्यवहार करावे लागते.कोरपना व जिवती या तालुकास्थळी राहणाऱ्या नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँकेत जाण्या-येण्याचा मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरपना परिसरात वनसडी व जिवती परिसरात पाटण येथेच एकमेव बँक असल्याने या शाखेचा व्याप वाढला आहे. त्यामुळे कोरपना व जिवती तालुका मुख्यालयी राष्ट्रीयीकृत बँकेची स्थापना करण्याची मागणी नागरिकांची आहे.गडचांदुरात दुसऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेची आवश्यकताऔद्योगिक शहर गडचांदूर येथे एकमेव स्टेट बँक इंडिया शाखेची राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेत खातेदाराची संख्या प्रचंड असल्याने ग्राहकांची कामे वेळेवर होत नाही. परिणामी मनस्ताप सहन करावा लागतो. शेतकरी, विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी , शिक्षक या सर्वाची खाते या बँकेत आहेत. तेव्हा शहरात दुसरी राष्ट्रीयकृत बँक स्थापन करावी, अशी मागणी येथील नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे.