शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची समस्या कायमची संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:50 IST

जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : १५ कोटी रूपयांच्या ३२ पाणीपुरवठा योजनांचे ई- भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये १५ कोटींची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची संपणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शनिवारी ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, अतिरिक्त मुख्य सचिव पाणीपुरवठा शामलाल गोयल उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यामध्ये ३२ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर पिपरे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे, पांढरकवडा येथील सरपंच रंजना डवरे, पंचायत समिती सदस्या सविता कोल्हे, उपसरपंच सुरज तोतडे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा ही ग्रामपंचायत १०० पाणीकर वसुली करणारी व स्मार्ट ग्रामपंचायत ठरल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचाचे कौतुक केले. त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यांमध्ये ज्या गावांमध्ये अशुद्ध पाणी आहे.या गावांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवावा, असे निर्देश दिले. बैठकीला गदगावच्या सरपंच पुष्पा शंकर गायकवाड, पांझुर्णीचे सरपंच भारती काळे, कातलाबोडीच्या सरपंच सविता ढेंगळे, जेवराचे सरपंच सुवर्णा वासेकर, उसेगावच्या सरपंच वैशाली गेडाम, बेलगावचे सरपंच अंबादास पाल, निफंद्राच्या सरपंच ममता खंडारे, मांगलीचे सरपंच नानाजी मुंडरे, निमगावचे सरपंच रूपाली ठाकरे, कळमगावचे संतोष डांगे, बेलसनीचे मंजुषा वाढई, पुनागुडाचे सरपंच कौशल्या कुळसंगे, शेंबडेचे सरपंच विजूमाला जिवतोडे, चांदगावचे सरपंच विद्या नागपुरे, कळमनाचे सरपंच निलेश वाडी साखरीचे सरपंच राजू घरोटे, वरगावचे उपसरपंच शंकर मोहितकर, चांदगावच्या उपसरपंच मनीषा बनसोड, मंगलीचे उपसरपंच गोकुलदास पंढरीकार, गदगावचे उपसरपंच धनराज डवले आदींचा समावेश होता.खनिज निधीचा उपयोग कराजिल्ह्यामध्ये खनिज विकास निधीची उपलब्धता आहे. यामुळे निधीची उपयोग करून विकासाची कामे पूर्ण करावी. प्रत्येक गावाला आरो मशीन बसवण्यासाठी प्राधान्याने नियोजन करावे. येत्या काही दिवसांमध्ये सोलरवर आधारित योजना कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंचांशी संवाद साधना दिली.