युवक काँग्रेस कमिटीची मागणी
विसापूर : बऱ्याच वर्षांपासून विसापूर पांदण रस्त्याचे काम रखडले असल्याने विसापुरातील शेतकऱ्यांना शेतात जाताना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यावर चिखल असल्याने बैलबंडी घेऊन जाणे अत्यंत जिकिरीचे काम झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतात कसे जायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याचे निवारण करून पांदण रस्त्याचे खडीकरण लवकरात लवकर करून ही समस्या सोडवावी, अशी मागणी युवक काँग्रेस कमिटी विसापूरने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकर पांदण रस्ता पूर्ण करण्याची हमी दिली. यावेळी प्रीतम पाटणकर, उमंग जुनघरे, गोविल खुणे व रोशन बाथम, देवांद्र उके, अंशुल रणदिवे, गौरव बार्टीने, रोहित साखरे, प्रशिक चुनारकर उपस्थित होते.