शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वरोºयातील केशवनगरात माकडांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरालगतच्या केशवनगर परिसरात मागील कित्येक दिवसांपासून माकडाने उपद्रव घालणे सुरू केले आहे. या माकडाने अनेकांना चावा घेवून जखमी केल्याच्या घटना दिवसागणिक वाढत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.वरोरा शहरानजीकच्या नागपूर - चंद्रपूर मार्गालगत आनंदवन चौकानजीक केशवनगर वसाहत आहे. या वसाहतीमध्ये मागील काही दिवसांपासून माकडांचा हैदोस सुरू ...

ठळक मुद्देनागरिक भयभीत : अनेकांचा घेतला चावा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरालगतच्या केशवनगर परिसरात मागील कित्येक दिवसांपासून माकडाने उपद्रव घालणे सुरू केले आहे. या माकडाने अनेकांना चावा घेवून जखमी केल्याच्या घटना दिवसागणिक वाढत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.वरोरा शहरानजीकच्या नागपूर - चंद्रपूर मार्गालगत आनंदवन चौकानजीक केशवनगर वसाहत आहे. या वसाहतीमध्ये मागील काही दिवसांपासून माकडांचा हैदोस सुरू आहे. घराच्या छतावर वाळवत घातलेले धान्य, अंगणात असलेल्या खाण्याच्या वस्तू पळविणे माकडाने सुरू केले आहे. यातच सध्या माकड एवढे निर्ढावले आहे की, एकट्या मनुष्याने त्यास पिटाळण्याच्या प्रयत्न केला असता, त्या व्यक्तीच्या अंगावर धावून जात त्याला जखमीही करीत असतात. माकडाने प्रौढ व्यक्ती सोबतच लहान बालकांनाही लक्ष केले असून उर्त्कष मनोज सातपुते या बालकास नुकतेच माकडाने गंभीर जखमी केले. जखमी बालकावर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.माकडाच्या उपद्रवामुळे नागरिकांचे परिसरात फिरणेही बंद झाले आहे. माकड परिसरातील झाडझुडपात दडून बसत एखादी व्यक्ती काही वस्तू घेवून जात असताना झडप घालत असते. त्यामुळे वस्तू पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने केशवनगरातील नागरिक त्रस्त झाले आहे. माकडांचा बंदोबस्त करण्याकरिता काही नागरिकांनी वनविभागास सुचना दिली. परंतु वनविभाग माकडांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केशवनगरातील नागरिकांनी केला आहे.दोन ते तीन वेळा जाळे टाकून माकडाला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु माकड सापडले नाही. आमचे प्रयत्न सुरू आहेत.- के.के. लोणकर,वनाधिकारी, वरोरा.