लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : शहरातील संपूर्ण रस्ते उखडले असुनसुद्धा नगरपंचायतने कोणतीही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे पावसाने संपूर्ण रस्त्यांची वाट लागली. परिणामी रस्त्यांची दुरवस्थेमुळे अपघात घडत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यांने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.शहरातील संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. याची दखल घेत नगरपंचायतर्फे रस्त्याच्या बांधकामाची निविदा प्रकाशित करण्यात आली. मात्र अद्यापही रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्यातच पावसाळ्याला सुरुवात झाल्याने शहरातील संपूर्ण रस्त्याची वाट लागली. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले. त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नसल्यामुळे लहानसहान अपघात घडत आहे.त्यामुळे शहरातील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:59 IST
शहरातील संपूर्ण रस्ते उखडले असुनसुद्धा नगरपंचायतने कोणतीही दुरुस्ती केली नाही. त्यामुळे पावसाने संपूर्ण रस्त्यांची वाट लागली. परिणामी रस्त्यांची दुरवस्थेमुळे अपघात घडत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यांने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताची शक्यता
ठळक मुद्देसंबंधित विभागाचे दुर्लक्ष : रस्त्याची दुरुस्ती करावी