आज लोकार्पण : मंत्र्यांची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरातील सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख केंद्र असणारे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाने कात टाकली असून आपल्या नव्या स्वरुपात जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू होत आहे. १३ जुलै रोजी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया, आ. ना.गो.गाणार, आमदार नाना शामकुळे, आ. विजय वडेट्टीवार, आ. सुरेश धानोरकर, आ. कीर्तीकुमार भांगडिया, आ.अॅड.संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, सार्वजनिक बांधकाम नागपूर विभागाचे अधिक्षक अभियंता रविंद्र आकुलवार, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, कार्यकारी अभियंता उदय भोयर उपस्थित राहणार आहेत. कलाप्रेमींनी उपस्थित रहावे.सभागृहाचे रुप पालटले नाट्य चळवळीतील अनेक मान्यवरांच्या मागणीवरुन १९९९ ला ही इमारत पूर्णत्वास आली. गेल्या २० वषार्पासून ही इमारत नाटय व साहित्य प्रेमींसाठी महत्वाचे केंद्र आहे. नाटय व कला क्षेत्रात अनेक तांत्रिक परिवर्तन झाले. या नव्या प्रवाहात आधुनिक ध्वनी, उच्च दर्जार्ची वातानुकूलित बैठक व्यवस्था व प्रकाश व्यवस्थेने परिपूर्ण असे प्रियदर्शनीचे स्वरुप असावे, असा विचार पुढे आला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सभागृहाचे अत्याधुनीकरण करण्याचे अभिवचन दिले होते. त्यानुसार हे सभागृह तयार झाले आहे. संपूर्ण सभागृह, रंगमंच, नवीन खुर्च्या, विद्युतीकरण, सभागृहाचे सिलिंग, वॉल पॅनेलींग, जनरेटर व हायमास्ट लायटींग अशा सर्व सुविधा येथे आहे.
प्रियदर्शिनी सभागृहाने कात टाकली
By admin | Updated: July 13, 2017 00:35 IST