शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कापूस दरवाढीने खासगी व्यापारी मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:25 IST

कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. मध्यंतरी कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल दरात कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचे दर पाच हजार आठशे रूपयांवर पोहचल्याने या कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकºयांच्या घरी आता कापूस शिल्लक नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

ठळक मुद्देकापूस विक्रीनंतर वाढले दर : शेतकऱ्यांना आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कापसाचे दर वाढेल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. मध्यंतरी कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल दरात कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचे दर पाच हजार आठशे रूपयांवर पोहचल्याने या कापूस दरवाढीचा सर्वाधिक लाभ खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकºयांच्या घरी आता कापूस शिल्लक नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा, भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवला जातो. कापूस पिकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने कवडीमोल भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. शासनाने कापूस पिकांसाठी पाच हजार चारशे पन्नास रूपये हमीभाव जाहीर केला. परंतु सरकारी केंद्रावरील जाचक अटीने शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी नेला नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी मिळेल त्या कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी केला.दरवर्षीपेक्षा यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असतानाच खुल्या बाजारपेठेत कापसाचे भाव गडगडले. काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने कवडीमोल दरात कापूस विकून आपली आर्थिक गरज भागविली. कापसाचे दर वाढण्याचे कोणतेच संकेत नसल्याने शेतकºयांनी बँकाचे कर्ज भरण्यासाठी कापूस विकून टाकला. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी कापूस पिकावर केलेला खर्चही भरून निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे.कापसाचे दर आता ४०० ते ५०० रूपयांनी वाढल्याने त्याचा सर्वाधिक फायदा खासगी व्यापाऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या घरी कापूस होता, त्यावेळेस भाव वाढले नाही. आता कापूस संपल्यावर कापसाचे दर वाढले आहे. त्यामुळे कापूस दरवाढीचा सर्वाधिक फायदा खासगी व्यापाºयांना झाला आहे. यात मात्र नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.कापूस दरवाढ कुणासाठी?शेतकरी आपल्या गरजेपोटी कवडीमोल दरात कापूस विकत असतो. यावर्षी कापसाची दरवाढ होईल, या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला होता. परंतु मार्च एन्डींगमध्ये कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला. आता कापसाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे.