शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बाजारपेठेत दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:26 IST

कापसाचे खासगी बाजारपेठेत वाढलेले भाव अचानक घसरल्याने त्याचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने कापसाचे दर कमी झाल्याने उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणार की नाही, याची चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगलीच सताऊ लागली आहे.

ठळक मुद्देकापूस उत्पादकांना आर्थिक फटका : कसा निघेल खर्च भरून ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापसाचे खासगी बाजारपेठेत वाढलेले भाव अचानक घसरल्याने त्याचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने कापसाचे दर कमी झाल्याने उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणार की नाही, याची चिंता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगलीच सताऊ लागली आहे.विदर्भ प्रांत कापूस उत्पादनात पूर्वीपासूनच अग्रेसर आहे. येथील काळ्या कसदार मातीत बळीराजा पांढरे सोने पिकवितो. खरे तर चंद्रपूर जिल्हा कापूस पिकविण्यात आजपर्यंत पुढे राहिला आहे. यंदा सुरूवातीपासूनच कापसाला बऱ्यापैकी भाव होता. जवळपास सहा हजारांपर्यंत कापसाचे दर गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या घरी सुबत्ता येईल, असे वाटत होते. मात्र खासगी बाजारपेठेत कापसाचे दर ४०० ते ५०० रूपयांनी कमी झाले. सध्या पाच हजार ५०० रूपयांनी खासगी बाजारपेठेत कापूस विकला जात आहे. कापसाची आवक वाढल्याने खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडल्याचे बोलले जात आहे. यावर्षी निसर्गानेही शेतकऱ्यांना साथ दिली नाही. त्यामुळे कापसासह अन्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला. परंतु यावर्षी कापसाने शेतकºयांचे घर अजूनही भरले नाही.जिथे २० क्विंटल कापूस व्हायला पाहिजे, त्या शेतात उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघणे कठीण आहे. कापूस चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांचे नगदी पीक आहे. गोवरी, पोवनी, वरोडा, साखरी, चार्ली, निर्ली, धिडशी, पेल्लोरा, चिंचोली, निंबाळा परिसरातील कपाशीची शेती वाळायला लागली आहे. खासगी बाजारपेठेत कापसाचे दर ५०० रूपयांनी खाली आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.कापूस उत्पादकांच्या पदरी निराशाचकापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक असल्याने शेतकरी दिवस रात्र शेतात काबाडकष्ट करतो. परंतु यावर्षी अपुऱ्या पावसामुळे निसर्गानेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. नापिकीने शेतकऱ्यांना घेतलेले कर्जही फेडणे मुश्किल झाले आहे. शेतकºयांना घामाचे दाम मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.यंदा कापूस पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी अतोनात खर्च केला. परंतु त्यानंतरही उत्पादनात घट झाल्याने यावर्षी कापसाची शेती शेतकऱ्यांना परवडण्यासारखी राहिली नाही. त्यात खासगी बाजारपेठेत कापसाचे दर घसरल्याने आम्ही चिंतातूर झाला आहे.- गणपत लांडे, शेतकरी.

टॅग्स :cottonकापूस