शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाअभावी खासगी वसतिगृहे उपाशी

By admin | Updated: August 11, 2015 01:37 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागद्वारा अनुदानित जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहांना सन

चंद्रपूर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागद्वारा अनुदानित जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहांना सन २०१४-१५ या वर्षाचे अनुदान देण्यात न आल्याने या वसतीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या तीन हजारावर विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू असून त्यांना अनेकदा उपासमारीचा सामना करावा लागत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने चंद्रपूर जिल्ह्यातील ६८ मागासवर्गीय वसतीगृहांना अनुदान देण्यात येते. ही वसतीगृहे खासगी संस्था चालवितात. या सर्व वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीन हजार इतकी आहे. मात्र मागील वर्षीपासून या वसतीगृहांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. गंभीर बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील वसतीगृहांना नियमित अनुदान दिले जात आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यामागे मिळणारे अनुदान अल्पमागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महिन्याकाठी केवळ ९०० रुपये अनुदान दिले जाते. महागाईच्या काळात हे अनुदान अतिशय अल्प आहे. या विद्यार्थ्यांच्या एका दिवसातील दोन वेळच्या जेवणाचा खर्च ३० रुपये येतो. एखादा विद्यार्थी आजारी पडला तर त्याच अनुदानातून उपचारासाठी खर्च करावा लागतो. या उलट शासकीय वसतीगृहातील प्रत्येक विद्यार्थ्यामागे तीन हजार रुपये अनुदान दिले जात आहे. शासनाकडून असा भेदभाव का, असा प्रश्न संस्था चालकांनी उपस्थित केला आहे. कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधनवसतीगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंजे मानधन देण्यात येते. ते देखील वेळेवर मिळत नाही. वसतीगृह अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार मदतनिस यांचे माहे मार्चपासूनचे मानधन अद्यापही थकीत आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. मागील वर्षीसुद्धा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने आठ महिन्यानंतर ऐन दिवाळीच्या दिवशी मानधन अदा केले होते. उधारीसाठी दुकानदारांचे हात वरजिल्ह्यातील मागासवर्गीय वसतीगृहांचे अनुदान थकीत असल्याने यावर्षीसाठी किराणा खरेदी, भाजीपाला, धान्य व इतर साहित्य कसे खरेदी करावे, असा प्रश्न संस्था चालकांना पडला आहे. कोणतेही दुकानदार वसतीगृह चालकांना उधारीवर साहित्य देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता वसतीगृह कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.