शिक्षण आयुक्तालय, पुणे येथील प्र. शिक्षण सहसंचालक, प्रशासन, अंदाज व नियोजन व्ही.के.खांडके यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांना २ नोव्हेंबर २० व तसेच ९ डिसेंबर २० च्या पत्राद्वारे कार्यवाही करण्यास सांगितले. असे असतानाही चंद्रपूर जिल्हा परिषदमधील प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन अनियमित होत आहे. अनियमित होणाऱ्या मासिक वेतनामुळे जिल्हा परिषद शिक्षक त्रस्त झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ( प्राथमिक) चे राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर यांनी शिक्षण आयुक्तालयाकडे पुन्हा पत्र पाठवून स्मरण करून दिले आहे. आता तरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग दखल घेऊन शिक्षकांचे वेतन १ तारखेला करतील, अशी अपेक्षाही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने व्यक्त केली आहे.
प्राथमिक शिक्षकांचे वेतन अनियमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST