शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

प्राथमिक शिक्षकांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 18, 2014 23:22 IST

सावली पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे सप्टेंबर २०१४ चे वेतन व डी.ए. एरिअर्स तसेच दिवाळी अग्रीम धन दिवाळीपूर्वी मिळायला पाहिजे होते. परंतु प्रशासनाच्या अनागोंदी

वेतन अडले : आनंदोत्सवावर विरजणसावली : सावली पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे सप्टेंबर २०१४ चे वेतन व डी.ए. एरिअर्स तसेच दिवाळी अग्रीम धन दिवाळीपूर्वी मिळायला पाहिजे होते. परंतु प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे व संवर्ग विकास अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे शिक्षकांना यंदाची दिवाळी पगाराविना अंधारातच काढावी लागणार आहे.सावली पंचायत समितीमधील शिक्षकांचे वेतन न दिल्याने शिक्षकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शनिवार १८ आॅक्टोबरला सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी (उ.श्रे.) पं.स. सावली यांची भेट घेतली असता त्यांनी एकमेकांवर बाजु ढकलून वेळकाढू धोरण अवलंबिले दिसून आले. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. दिवाळीपूर्वी सप्टेंबरचा पगार होत नसल्यामुळे बाहेरगावी व जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या शिक्षकांना पगाराविना स्वगावी जात आहेत.संवर्ग विकास अधिकाऱ्यांसोबतच शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक व लेखा विभागातील सर्व कर्मचारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, यावर्षी आजतागयत शिक्षकांच्या समस्याबाबत समस्या निवारण सभा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व संघटनेच्या वतीने शिक्षण विभाग व लेखा विभागाचा शनिवारी निषेध करण्यात आला. असाच प्रकार पुढे घडल्यास आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)