शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

धनोजे कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

By admin | Updated: July 30, 2015 01:03 IST

आजचे शिक्षण हे केवळ नोकरी ओरीएंटेड झाले असून त्यातून मुल्यांची शिकवण मिळत नसल्यामुळे सध्याची पिढी उच्च शिक्षित होत असली तरी सुसंस्कृत होताना दिसत नाही.

पाहुण्यांचा सूर : नोकरीधार्जिणे नव्हे, मूल्यांवर आधारित शिक्षणाची गरजचंद्रपूर : आजचे शिक्षण हे केवळ नोकरी ओरीएंटेड झाले असून त्यातून मुल्यांची शिकवण मिळत नसल्यामुळे सध्याची पिढी उच्च शिक्षित होत असली तरी सुसंस्कृत होताना दिसत नाही. अन्यथा समाजाला वृद्धाश्रमाची गरज पडली नसती, असे विचार अखिल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक दिलीप सोळंकी यांनी व्यक्त केले आहे.धनोजे कुणबी समाज चंद्रपूरचे वतीने सोमवारी पार पडलेल्या इयत्ता १० वी ते १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ‘शिक्षणाचा अर्थ, अनर्थ आणि अन्वयार्थ’ या विषयावर मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी विजय वाकूलकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. प्रभा वासाडे, प्रा. रवी झाडे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. आय.डी. कुरेकर, सचिव एल.डी. उरकुडे, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. भास्कर सूर, आयोजन समितीचे सचिव उमाकांत धांडे, नगरसेवक राहुल पावडे, प्रा. निळकंठ बलकी, भाऊराव निखाडे, भाविक येरगुडे, आबाजी देवाळकर, सुधाकर जोगी, अल्का खापणे, सुमित्रा बोढे आदींची उपस्थिती होती.यावेळी इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यासोबतच मुला व मुलींमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या प्रणाली अतकरी, निखील उपरे, तुषार जांभूळकर, रजत झाडे, हर्षदा पिंपळकर, मोहित जीवतोडे, हर्षदा झाडे, हृषिकेश कोटी, प्रिया गौरकार, प्रियंका फरकाडे, शुभम बोभाटे, रूपाली बोढे, मंजुषा उकीनकर, समिक्षा डोंगे, सुरज आस्वले, राहुल डाखरे, स्नेहल धोटे, अंजली ठावरी, कांचन राजुरकर, अनिकेत देठे, गौरव दिवसे, हितेश भुसारी, तृषा नागपुरे, रूपाली मोडक, ओमेश्वरी ढोके, शुभम वराटकर यांना सन्मानित केले. (शहर प्रतिनिधी)